चमत्कारच! चष्म्याला करा बाय बाय! नवीन आय-ड्रॉप भारतात लाँच, अवघ्या १५ मिनिटांत होईल ‘कमाल’, सरकारची सुद्धा मान्यता!

Specs removal eye drops


Telegram Group Join Now

आजकाल चष्मा हा आपल्याकडे जवळपास सर्वाचीच गरजेची वस्तू बनली आहे. आपल्याकडे अनेकांना टीव्ही पाहताना किंवा वर्तमानपत्र वाचताना चष्म्याचा वापर करावा लागतो. चष्मा न वापरता दिसत नाही, आता चष्मा वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एक नवीन ‘आय ड्रॉप्स’ आहे हे महत्वाचे, यामुळे १५ मिनिटांत तुमच्या दृष्टीत बदल होऊ शकतो. ड्रग रेग्युलेटर, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतातील पहिल्या ‘आय ड्रॉप्स’ला मान्यता सुद्धा दिली आहे. यामुळे चष्माशिवाय वाचता आणि पाहता येणार आहे. मुंबईमधील एन्टोड फार्मास्युटिकल्सने मंगळवारी पायलोकार्पिन वापरून बनवलेले ‘प्रेस्वू’ नावाचे ‘आय ड्रॉप्स’ बाजारात आणले. हे औषध डोळ्यातील ‘प्रेस्बायोपिया’वर उपचार करते. प्रेस्बायोपिया ही वय-संबंधित स्थिती आहे, यामध्ये जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याची डोळ्यांची क्षमता कमी होते. या औषधाने आपल्या दृष्टीत आमूलाग्र बदल होऊ शकतो!!

Specs removal eye drops

 

ए्न्टोड फार्मास्युटिकल्सचे सीईओ निखिल के मसुरकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, औषधाचा एक थेंब १५ मिनिटांत प्रभाव दाखवू लागतो आणि त्याचा प्रभाव पुढील सहा तास टिकतो. पहिल्या थेंबाच्या तीन ते सहा तासांच्या आत दुसरा थेंब टाकला तर त्याचा प्रभाव जास्त काळ टिकेल. “आतापर्यंत, जवळचे पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी चष्माचा वापर केला जात होता.किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर केला जात होता. दृष्टीसाठी कोणतेही औषध-आधारित उपाय उपलब्ध नव्हते, असंही ते म्हणाले.

 

एन्डोड फार्मास्युटिकल्स नेत्र, त्वचाविज्ञान यावर औषध निर्मितीत आहे. ही औषधे ६० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करतात. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून, हे प्रिस्क्रिप्शन-आधारित थेंब फार्मसीमध्ये ३५० रुपये किमतीत उपलब्ध होतील. हे औषध ४० ते ५५ वर्षे वयोगटातील लोकांसाठी सौम्य ते मध्यम प्रिस्बायोपियाच्या उपचारांसाठी योग्य आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.