सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये बदल १ ऑक्टोबरपासून लागू होतील | Sukanya Samriddhi Yojana New Rules

Sukanya Samriddhi Yojana New Rules


Telegram Group Join Now

Sukanya Samriddhi Yojana New Rules

Sukanya Samriddhi Yojana New Rules: लोकप्रिय सुकन्या समृद्धी योजनेच्या (SSY) नियमांमध्ये मुलींसाठी मोठा बदल करण्यात आला आहे. खाते उघडताना होणाऱ्या त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. हे नियम १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होतील. नवीन नियमांनुसार, कायदेशीर पालक किंवा जन्मदात्या पालकांनी न उघडलेल्या खात्यांचे हस्तांतरण कायदेशीर पालकांच्या नावे केले जाईल. पूर्वी आजी-आजोबा नातवंडांसाठी सुकन्या खाती उघडू शकत होते. मात्र, नव्या बदलानुसार केवळ कायदेशीर पालक किंवा जन्मदाते पालकच ही खाती उघडू आणि हाताळू शकतात. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. नवीन नियमांनुसार, दोनपेक्षा जास्त खाती असल्यास अतिरिक्त खाते बंद केले जाईल.

सुकन्या समृद्धी योजना काय आहे? सुकन्या समृद्धी ही सरकार पुरस्कृत बचत योजना आहे. भारत सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बचतीवरील व्याजदर ८.२० टक्के आहे. हे खाते १० वर्षांखालील मुलीच्या नावे उघडता येते.

खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच हे खाते मॅच्युअर

खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मुलीचा जन्म दाखला आणि पालकांची ओळख व पत्त्याचा पुरावा अनिवार्य आहे. याशिवाय पालकांचे पॅन कार्ड अनिवार्य आहे. त्याचबरोबर वारसदार अनिवार्य करण्यात आला आहे. नॉमिनी (वारस) एक किंवा अधिक व्यक्तींना केले जाऊ शकतात, परंतु चारपेक्षा जास्त व्यक्ती नॉमिनी असू शकत नाहीत. सुकन्या खाते कमीत कमी ₹२५० मध्ये उघडता येते. प्रत्येक आर्थिक वर्षात या खात्यात जास्तीत जास्त ₹१,५०,००० योगदान देता येते. खाते उघडल्याच्या तारखेपासून १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत योगदान खात्यात जमा केले जाते. तसेच, खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच हे खाते मॅच्युअर होते.

पीपीएफच्या नियमांतही बदल

PPF नियमांमध्ये बदल जर अल्पवयीनाच्या नावे PPF खाते उघडले असेल, तर त्या खात्यातील रक्कम त्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत पोस्ट ऑफिस बचत खात्याप्रमाणे व्याज मिळेल. खातेधारकाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, PPF नियमांनुसार व्याज दिले जाईल. तसेच, या खात्याचा परिपक्वता कालावधी खातेधारकाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यापासून मोजला जाईल.

एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते असल्यास…

जर एकापेक्षा जास्त PPF खाती असतील… जर एकापेक्षा जास्त PPF खाती उघडली असतील, तर मूळ खात्याला नियमांनुसार व्याज मिळेल. दुसऱ्या खात्यातील रक्कम पहिल्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. त्यानंतर एकूण रकमेवर PPF दराने व्याज मिळेल. दोनपेक्षा जास्त खाती असल्यास, त्या रकमेवर शून्य टक्के व्याज मिळेल.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.