Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


दीड लाख महिलांना मोफत तीन गॅस सिलिंडर, लाभार्थीची यादी तयार – Ujjwala Beneficiary List 2024

Ujjwala Beneficiary List 2024


Telegram Group Join Now

‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ अंतर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेचे एक लाख ६७ हजार ग्राहक असून त्यांची यादी पुरवठा विभागाने तयार केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाणार असून सध्या या लाभार्थीचे ई-केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. उज्वला योजनेच्या लाभाध्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही तीन गैस सिलेंडर मोफत देण्याचा मुख्यमंत्र्यांनी आग्रह केल्याचे बोलले जात आहे. सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ujjwala beneficiary list

उज्वला योजनेतील लाभाध्यर्थ्यांना केंद्र सरकार एका गॅस सिलिंडरमागे ३०० रुपये अनुदान देते, तर एका गॅस सिलिंडरची बाजारातील सरासरी किंमत ८३० रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्यांला प्रति सिलेंडर ५३० रुपये याप्रमाणे तीन गॅस सिलेंडरच्या मयदित राज्य शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. केंद्राबी योजना राबविल्यास त्याचा राज्यातील महायुती सरकारला अपेक्षित लाभ मिळू शकणार नाही म्हणून राज्याची स्वतंत्र योजना म्हणून राबविण्यात येणार आहे. उज्वला योजनेच्या लाभाध्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही तीन गैस सिलेंडर मोफत देण्याचा मुख्यमंत्र्यांनी आग्रह केल्याचे बोलले जात आहे. मात्र, यामुळे सरकारच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढेल, अशी चिंता नियोजन आणि वित्त विभागाने व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे तुर्तास मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ उज्वला योजनेतील लाभार्थींनाच दिला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार लाभार्थी आहेत.

■ उज्वला योजनेतील लाभार्थीची ई-केवायसी करून घेणे
■ उज्वला गॅस योजनेतील लाभार्थीची यादी अंतिम करणे • प्रस्तावित मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची तालुकानिहाय प्रचार-प्रसिद्धी करणे
■ गॅस एजन्सी, पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधीची बैठक घेऊन योजना लाभार्थीपर्यंत पोचविणे

राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण बोजना, बळिराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुलींना मोफत उच्चशिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, आशा योजनांचे शासन निर्णय काही दिवसांतच काढले गेले. पण, गॅस सिलिंडरच्या महागाईमुळे त्रस्त महिलांना आधार देण्यासाठी नियोजित मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अद्याप निघालेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांनाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत द्यावेत आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा येईल, या दोन मत्प्रवाहात शासन निर्णय अडकल्याचे सूत्रांनी सांगितले.

Click Here To Check Bharat Gas Ujjawala Beneficary List



अन्य महत्वाचे जॉब बघा..
2 Comments
  1. Hirmat Sanjay Naitam says

    Parbhani mantri ujaval yojna Sabcd

  2. अमीत says

    अमीत

Leave A Reply

Your email address will not be published.