आता महाराष्ट्र वयोश्री योजना, जेष्ठांना मिळणार सरळ खात्यात ३ हजार रुपये!

Vayoshri Yojana Maharashtra


Telegram Group Join Now

राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-वयोश्री योजेनेचा अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. मनपाद्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आजवर १४ हजार ९७५ अर्ज वितरित करण्यात आले असल्याचे सांगितले. प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त सभा कक्षात बुधवारी ज्येष्ठ नागरिक मंडळांची बैठक झाली. बैठकीतआयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा योजनासंदर्भात ज्येष्ठ नागरिक  मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

vayoshri yojana maharashtra

राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत मिळणार आहे. याची पावती त्यांना मनपामध्ये जमा करायची आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा योजनेचे नोंदणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था मनपाच्या दहाही झोन कार्यालयात व मनपा मुख्यालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात करण्यात आली आहे.

तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे नोंदणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था मनपाच्या सर्व ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासह मनपाच्यादहाही झोन कार्यालय, प्रभाग निहाय व आरोग्य वर्धिनी केंद्रावर करण्यात आली आहे. या केंद्रांवर दररोज नोंदणी अर्ज स्वीकारले जात असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. या योजनेंतर्गत पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंगवॉकर, कमोड खुर्ची, नि ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी उपकरणे खरेदीकरिता थेट अर्थसहाय देण्यात येत आहे.

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..
2 Comments
  1. maroti says

    ya yojnechi link kadhi yenar aahe sir

  2. Purushottam Shisave says

    मुख्यमंत्री वयोश्री योजना करिता लाभ साठी तुम्हच्या रेशनिंग कार्ड मधून मुलांची नावे काडून टाका आणि फक्त तुम्हचे पती पत्नी चेच नाव राहूदे.
    तेव्हाच तुम्हाला हा शासकीय लाभ मिळेल,
    असं आम्हचा आपटी तर्फे चोण ग्रामपंचायत चे ग्रामसेवक तलाठी
    बाबांना सांगत होते.
    काय संबंध आहे??

Leave A Reply

Your email address will not be published.