विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरु, लिंक उपलब्ध!
vitthalrukminimandir online darshan pass
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या विविध पूजा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजानोंदणीसाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली. १ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या रोज नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदन उटी पूजा, आदी पूजा केल्या जातात. Vitthalrukminimandir online darshan pass apply online.
या साठी समितीकडून फी आकारली जाते; तसेच इतर जिल्ह्यांतील लोकांना पंढरपुरात येऊन पूजा करणे शक्य यासाठी पूजा बुक करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याबाबत मंदिर समितीच्या, २० ऑगस्टला सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. भाविकांना पूजेची नोंदणी https:// www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. गर्दीचे दिवस वगळून नोंदणी ७ ऑक्टोबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध आहेत.