Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Way To Recover Money From Cyber Scam


Telegram Group Join Now

Way To Recover Money From Cyber Scam

26.48 crore rupees were returned to citizens in 12 months

Way To Recover Money From Cyber Scam: There is indeed a wealth of information on Google. So, for any kind of information, Google is searched. Scammers have taken advantage of this. Given the rising trend of citizens, the robbers have uploaded bogus websites, and numbers on Google. They were also running at the top in the search engines, this has been revealed so far due to the actions taken by the Mumbai Police. So transact only after verifying the information on Google.

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे कि आजच्या महिती तंत्रज्ञान च्या जगात ऑनलाईन सायबर फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोक ऑनलाइन ऑफर्स आणि जॉबच्या नावाने फसल्या जात आहेत. त्यांमध्ये ऑनलाइन जॉब फसवणूक (online jobs Fraud), LIC विमा पॉलिसी फसवणूक, Rewards program Fraud, online click, kyc इत्यादी.आता जर अश्या ऑनलाईन सायबर फ्रॉड मुळे एखाद्या व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक झाली तर प्रथम काय करायला पाहिजे ज्यामुळे पैसे परत मिळतील आणि गुन्हेगारवर कायदेशीर कार्यवाही होइल, त्या बद्दल संपूर्ण माहिती आम्ही येथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या मुळे संपूर्ण माहिती नक्की वाचा व आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

१ लाख ११ हजार ३५७ हून अधिक नागरिक ऑनलाइन लुटीच्या जाळ्यात

गेल्या वर्षभरात ऑनलाइन व्यवहार करणारे हजारो नागरिक भामट्यांना बळी पडले. योग्य तांत्रिक ज्ञान नसल्याने १ लाख ११ हजार ३५७ हून अधिक नागरिक ऑनलाइन लुटीच्या जाळ्यात अडकले. या नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर त्वरित पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे या सर्वांचे एकूण २६ कोटी ४८ लाख २२ हजार २०९ रुपये परत मिळवून देण्यात मुंबई पोलिस दलाच्या सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहा. गुगलवरील माहितीची शहानिशा करावी. कुठल्याही क्रमांकावरून आलेल्या लिंकला क्लिक करू नका, डेबिट, क्रेडिट कार्डचा नंबर, सीव्हीव्ही सांगू नका अन्यथा फसवणुकीला बळी पडाल, असेही आवाहन पाेलिसांनी केले आहे.

गुगलवर पसरवले लुटीचे जाळे :

  • ऑनलाइनच्या स्मार्टनेसच्या युगात प्रत्येकाच्या हाती मोबाइल असल्याने अनेक जण ऑनलाइन व्यवहाराला पसंती देत आहेत. ही बाब लक्षात घेत भामट्यांनी नागरिकांना लुटण्यासाठी गुगलवर जाळे पसरविले आहे.
  • नामांकित हॉटेल, दुकाने, बँका, कंपन्यांसह तीर्थस्थळांच्या नावाने बोगस वेबसाइट भामट्यांनी तयार केल्या आहेत. या वेबसाइट गुगल सर्च इंजिनमध्ये टॉपला दिसत होत्या. त्यामुळे अनेक जणांची ऑनलाईन फसवणूक झाली, अशी माहिती मुंबई पोलिस दलाच्या सायबर गुन्हे शाखेने दिली.

सावधान! माहितीची शहानिशा करा…

गुगलवर माहितीचा खजिना आहे, हे जरी सत्य आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या माहितीसाठी गुगलवर सर्च केले जाते. याचाच गैरफायदा भामट्यांनी घेतला आहे. नागरिकांचा वाढता कल पाहता लुटारूंनी बोगस वेबसाइट, नंबर गुगलवर अपलोड केले आहेत. तेही सर्च इंजिनमध्ये टॉपला रन करत होत्या, हे आतापर्यंत मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे उघडकीस आले आहे. त्यामुळे गुगलवर असलेली माहितीची शहानिशा करूनच व्यवहार करा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर यांनी केले आहे. ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्यावर त्वरित १९३० या टोल फ्री कमांकावर अथवा http://cybercrime.gov.in येथे तक्रार करा. त्यामुळे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे – डॉ. डी. एस. स्वामी,सायबर गुन्हे, मुंबई पोलिस.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.