What is Revised Pension Scheme For State Government Employees – राज्यातील कर्मचाऱ्यांना १ मार्चपासून सुधारित पेन्शन योजना जाहीर

Maha govt announces revised NPS


Telegram Group Join Now

What is Revised Pension Scheme For State Government Employees: A meeting of representatives of the State Government Employees Central Association was held in Karir’s hall. If there is a proposal from the concerned department regarding the recruitment of Class IV employees, it will be given due consideration, a decision will be taken after studying the current situation regarding filling the vacant posts of drivers. Vishwas Katkar, general secretary of the organization, said that a decision will be taken after studying and taking the decision regarding giving extended childcare leave to the government employees

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना १ मार्चपासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येणार असून, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे, अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली.

राज्यात शासकीय-निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ मार्च २०२४ पासून सुधारित पेन्शन योजना जाहीर झाल्याची माहिती पुणे विभागाची सचिव पी. एन. काळे यांनी दिली. त्यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, समन्वय समितीतर्फे सर्वांना जुनी पेन्शन मिळावी, यासाठी राज्यामध्ये गेल्या वर्षी ७ दिवसांचा बेमुदत संप पुकारण्यात आला होता. या संपामध्ये राज्यातील कामगार कर्मचारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी १ मार्च २०२४ पासून सन २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचे जाहीर केले आहे. वास्तविक, जुन्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांना अपेक्षित आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.