What to do if I have two voter ID – मतदान कार्डबाबत चूक केल्यास भोगावी लागू शकते तुरुंगवासाची शिक्षा; जाणून घ्या योग्य प्रक्रिया

What to do if I have two voter ID


Telegram Group Join Now

What to do if I have two voter ID

What to do if I have two voter ID: Elections have been announced across the country. While this is the case, many people are working hard to get their voter ID cards. However, if you make this mistake while producing this voter ID card, you can be jailed for up to one year. This information is essential to avoid this.

निवडणूक ओळखपत्र आजही खूप महत्वाचे आहे. केवळ निवडणूक आली की नाही तर इतर सरकारी कामांसाठी देखील हे ओळखपत्र उपयोगी पडते. परंतु आजही अनेकांकडे एकापेक्षा जास्त ठिकाणची ओळखपत्रे आहेत. निवडणूक आयोग यावर काम करत आहे. काही वेळा अशी ओळखपत्रे सापडतातही. परंतु त्यावर कार्यवाही होत नाही. अशा प्रकारे एकाच व्यक्तीकडे एकपेक्षा अधिक व्होटिंग कार्ड असणे गुन्हा आहे. यासाठी १ वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते.

तुमच्याकडे असेच जुने, गावाकडचे निवडणूक ओळखपत्र असेल तर ते सरेंडर करा. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया आहे. ऑफलाईन म्हणजेच तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार ऑफिसमध्ये निवडणूक विभागात जाऊन अर्ज करून तुम्ही तुमचे नको असलेले व्होटिंग कार्ड रद्द करू शकता.

ऑनलाईनसाठी तुम्हाला ईसीआयच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे. तिथे तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवून तुम्ही नको असलेले व्होटिंग आयडी कार्ड रजिस्टर करून ते रद्द करण्याची विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म 7 भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही काळ वाट पहावी लागेल. तुमचे ओळखपत्र रद्द झालेय का हे तपासण्यासाठी तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता.

सरेंडर कसे करावे – How To Cancel One Voter ID If Having Two Card

एकव्यक्तीकडे दोनपेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार यांद्यांमध्ये नाव असल्यास हे रद्द करण्यासाठी तुम्हाला फॉर्म ७ भरणे गरजेचे आहे. ही प्रोसेस तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकतात. सर्व माहिती योग्य भरल्यास तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल

ऑनलाइन स्टेटस तपासणे – Voter ID Online Steps

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला ओळखपत्रा सबंधित आवश्यक माहीती मिळू शकते. तसेच नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करणे देखील तुम्हाला शक्य आहे. सध्याच्या कालावधीत मतदारांना ओळखपत्र काढण्यास एक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवत तुमचे काम तुम्हाला मार्गी लावता येईल.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.