Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर येथे ४ हजार पदांसाठी मेगा भरती! -Yantra India Limited Jobs 2024

Yantra India Limited Jobs 2024


Telegram Group Join Now

यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर अंतर्गत मेगा भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये इच्छूक उमेदवारांना शिकता शिकता पैसे मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण ४०३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारानांनी हे लक्षात घ्यावे की अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल ऑक्टोबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात उघडले जाण्याची शक्यता आहे.

Yantra India Limited Jobs 2024

 

पदाचे नाव – अप्रेंटिस या पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
पदसंख्या – या भरतीमध्ये एकूण ४०३९ जागा भरण्यात येणार आहेत.
१. नॉन-आयटीआय उमेदवारांसाठी एकूण १४६३ जागा भरण्यात येणार आहेत.
२. आयटीआय साठी २५७६ जागा भरण्यात येणार आहेत.

  • परीक्षा फी – या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी कोणतीही परीक्षा फी नाही
  • पगार – निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.
  • नोकरी करण्याचे ठिकाण – या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.
  • वयोमर्यादा – १४ ते १८ वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत – उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अधिकृत वेबसाईट – अधिक माहितीसाठी https://yantraindia.co.in/ या वेबसाईटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता
– नॉन-आयटीआय उमेदवारांनी दहावी परीक्षेत किमान ५० टक्के गुणांसह आणि गणित आणि विज्ञान प्रत्येकी विषयांमध्ये ४० टक्के गन मिळवलेले असावेत.
– NCVT किंवा SCVT किंवा कौशल्य विकास मंत्रालय/श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट केलेल्या NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित विभागात परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
– मॅट्रिक्युलेट आणि आयटीआय दोन्हीमध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक.
– ऑनलाइन अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराकडे पात्रता असणे आवश्यक आहे.

उमेद्वारांनी हे लक्षात घ्यावे की अनपेक्षित परिस्थितीमुळे वेबसाइट, म्हणजे https://www.yantraindia.co.in/ क्रॅश झाली होती. त्यामुळे या अर्ज परत सुरु करण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासंबंधित सगळी माहिती आणि इतर तपशील https://recruit-gov.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. तसेच www.apprenticeship.gov.in या भारत सरकारच्या पोर्टलद्वारे आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांनी https://recruit-gov.com या संकेत स्थळावरून पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.