मुख्यमंत्री योजनादूत योजनेत करा अर्ज, महिन्याला मिळणार १० हजार; कोणती कागदपत्रे आवश्यक ?Yojana Doot Application Form 2024 @ mahayojanadoot.org

Yojana Doot Application Form 2024 @ mahayojanadoot.org


Telegram Group Join Now

Government of Maharashtra has introduced various welfare schemes for its citizens. As a part of these efforts, the government has implemented the initiative scheme “Shasan Aaply Dari” to reach the citizens directly at their doorsteps. This initiative has enabled people to know about and benefit from multiple schemes under one roof. Yojnadoot is an extension of the initiative (mahayojanadoot.org), which aims to reach out to the masses through the dedicated efforts of energetic youth who are eager to bring about social change

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. 


या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात २ हजार ४०८ योजनादूत नेमण्यात येणार असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी https://www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड करण्यात येणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
7 Comments
  1. Vishal maske says

    Vishal manohar maska

  2. Anuradha GEDAM says

    अंगणवाडी supervisor results

  3. Anuradha GEDAM says

    Icds supervisor results 2023

  4. Admin says

    new information

  5. Gayatri Pankaj Patil says

    Yojnadut sathi registration already kele ahe…pn punha registration krtana registration ahe as sangt ahe pn amchi nivad zali ki nahi te ks klnar so please help me

  6. Shalini Shankar Rathod says

    मुख्यमंत्री योजनादूत योजनेत करा अर्ज, महिन्याला मिळणार १० हजार
    हे खर आहे का मला शिक्षणासाठी पैसे पाहिजे ?
    10 हजार मिळणार का ?

  7. Shalini Shankar Rathod says

    हे खर आहे का मला शिक्षणासाठी पैसे पाहिजे ?
    10 हजार मिळणार का ? मुख्यमंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.