आनंदाची बाब, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी चार हजार उमेदवारांची झाली निवड!
yuva karya prashikshan Yojana jobs
सध्या महाराष्ट्रात सरकारच्या विविध योजनांचा पूर्ण महाराष्ट्रात बोलबाला सुरु आहे. यात अनेक नवीन योजना सरकार द्वारे सुरु करण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत उमेदवारांना सहा महिन्यांसाठी सहा हजार रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जात आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात चार हजार १८२ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. यातील २,९८४ उमेदवार शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू ही झाले आहेत. या संदर्भातील नवीन अपडेट्स खाली दिलेले आहे.
शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व विभागातील मंजूर पदांच्या पाच टक्के पदे कौशल्य विकास विभागाच्या महास्वयं पोर्टलवर तात्काळ नोंदवावीत, प्रशिक्षणार्थ्यांना कार्यालयात रुजू करुन घ्यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच शासकिय व खासगी आस्थापनांना दिले आहेत. त्यानुसार गेल्या महिन्यापासून आतापर्यंत शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये आतापर्यंत चार हजार १८२ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यापैकी २९८४ उमेदवारांना प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात आले आहे.
नोकरी मिळविणाऱ्या युवक-युवतींसाठी या योजनेद्वारे चांगली संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यातून युवकांना नोकरीक्षम बनविण्यासाठी मदत होते. या प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतन शासनाकडून दिला जात आहे.