Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


७ वी पास उमेदवारांना ४० हजार पगार!-जिल्हा न्यायालयामध्ये “सफाईगार” पदांची भरती सुरु!

District Court Chandrapur Recruitment


Telegram Group Join Now

District Court Chandrapur Recruitment – नोकरीच्या शोधात असलेल्या ७ वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक मोठी संधी चालून आली आहे, आणि ती पण जिल्हा न्यायालयात. मित्रांनो, जिल्हा न्यायालयच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित जाहिराती नुसार येथे सफाई कामगार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली असून या जाहिरातीची लिंक आम्ही खाली दिलेली आहे.  या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त ७  वी पास आहे. हि भरती प्रक्रिया ५  पदांसाठी राबविण्यात येत आहे. यापैकी ४ पदे सर्वांसाठी खुले आहेत तर १  पद हे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी आहे. आणि अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्ट द्वारे स्वीकारल्या जातील. तर या पदासाठी मासिक वेतनमान १५,००० ते ४७,६०० रुपये आहे. म्हणजे नोकरीची एकदम मस्त संधी आपल्यासाठी चालून आली आहे. चला तर या भरतीबद्दल अन्य माहिती बघूया. 

District Court Chandrapur Recruitment

तसेच मित्रांनो, इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या PDF जाहिरातीच्या खंड ‘क’ मध्ये नमुद केलेल्या आवश्यक डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) सह परिशिष्ट-अ मधील नमुन्यानुसार, दिनांक १०/०६/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहचतील या बेताने प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), बस स्टेंड समोर, चंद्रपूर ४४२ ४०१ या पत्यावर फक्त शीघ्र टपालाद्वारे (Speed Post) पाठवावेत. तसेच वरील अर्ज समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर “सफाईगार पदासाठी अर्ज” असे स्पष्टपणे लिहीणे आवश्यक आहे. आणि हो, सफाईगार हे एकाकी पद (Isloated Post) असून, सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत यांची उमेदवाराने नोंद घ्यावी. तसेच नोकरीचे ठिकाण चंद्रपूर आहे.  अर्ज शुल्क ३०० /-रुपये इतके आहे.

 

जिल्हा न्यायालयामध्ये “सफाईगार” पदांची भरती बद्दल संक्षिप्त माहिती 

  • पदाचे नाव – सफाईगार
  • पदसंख्या – 05 जागा (४ खुला + १ प्रतीक्षा यादी)
  • शैक्षणिक पात्रता – ७ वी पास .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन स्पीड पोस्ट द्वारे
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), बस स्टेंड समोर, चंद्रपूर ४४२ ४०१.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जून २०२५
  • अर्ज शुल्क – ३०० /-
  • अधिकृत वेबसाईट – https://chandrapur.dcourts.gov.in/

 

या भरती साठी पात्रता काय आहे ?

  • उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • शैक्षणिक अर्हता-
    • उमेदवार किमान ७ वी (सातवी) इयत्ता उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ असावी, जेणेकरून त्यापदावरील कर्तव्य तो पार पाडु शकेल.
    • उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • अनुभव :-उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकिय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य दिल्या जाईल.
  • अन्य माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात वाचावी, हि PDF मराठी मध्ये दिलेली आहे.

या भरती साठी निवड प्रक्रिया काय आहे ?

आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प सूची (short list) प्रमाणे पात्र उमेदवारांना येथे दिलेल्या पुढील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. या अंतर्गत ३० गुणांची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी घेण्यात येणार असून पस होण्यासाठी उमेदवारांना कमीतकमी १५  गुण मिळणे आवश्यक आहे. तसेच दुसरी स्टेप म्हणजे वैयक्तिक मुलाखत ज्याला २० गुण असणार आहे, या पैकी उमेदवाराला कमीतकमी १० गुण मिळणे आवश्यक आहे. पूर्ण डिटेल माहिती PDF मध्ये नमूद आहे, तरी काळजीपूर्वक वाचावी.

तसेच, उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर करण्याच्या दिवशी धारण करीत असलेली अचूक शैक्षणिक पात्रतेबाबतची माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती भरताना उमेदवाराने पात्रता खाली दिलेल्या क्रमानुसार नमूद करावी.
१) ७ वी
२) एस. एस. सी (S.S.C)
३) एच. एस. एस. सी. (H.S.S.C) किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेली पदवी.
४) अर्ज दाखल करतेवेळी उमेदवार धारण करीत असलेली उच्च शैक्षणीक पात्रता नमूद करणे बंधनकारक राहील.
५) शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पूर्वानुभव असल्यास त्या संबंधीचा दाखला.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरतीच्या महत्वाच्या लिंक 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/GuUbP
✅ अधिकृत वेबसाईट https://chandrapur.dcourts.gov.in/


अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.