Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



केंद्राच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून दारिद्र्यरेषे खालील कुटुंबांना आधार नवीन महत्वाची योजना – Rashtriya Kutumb Labh Yojana 2026

Rashtriya Kutumb Labh Yojana 2026


Telegram Group Join Now

Rashtriya Kutumb Labh Yojana – If the main earner of a BPL family dies, the family faces financial crisis. In such a situation, the National Family Benefit Scheme of the Central Government provides a lump sum of Rs 20,000. In the last year, many families in the state have benefited from the scheme. This centrally sponsored scheme comes under the National Social Assistance Programme. In the event of a natural or accidental death of the main earner of a BPL family between the ages of 18 and 59, a lump sum of Rs 20,000 is given to the family. This assistance provides immediate support to the family. The application can be made at the Sanjay Gandhi Niradhar Anant Yojana branch or at the District Collector’s Office, Talathi’s Office under Rashtriya Kutumb Labh Yojana 2026. The application can be downloaded from the website nsap.nic.in.

दारिद्रयरेषेखालील (BPL) कुटुंबातील मुख्य कमावत्या स्त्री किंवा पुरुष सदस्याचा मृत्यू झाल्यास कुटुंब आर्थिक संकटात सापडते. अशा वेळी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते. गेल्या वर्षभरात राज्यात अनेक कुटुंबांना योजनेचा लाभ मिळाला आहे. ही केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रमांतर्गत येते. दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील मुख्य कमावत्या व्यक्तीचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपये दिले जातात. ही मदत कुटुंबाला तत्काळ आधार देते. अर्ज संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात, तलाठी कार्यालयात करता येतो. nsap.nic.in संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करता येतो.

Rashtriya Kutumb Labh Yojana 2026

List of Documents for Rashtriya Kutumb Labh Yojana 2026

Following is the list of Rashtriya Kutumb Labh Yojana required documents. If you fulfill the conditions & list of important documents.

पुरावे आणि आवश्यक कागदपत्रे कोणती?
मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्तीचे वय प्रमाणपत्र, तलाठी, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र (कुटुंब बीपीएल असल्याचे आणि मृत मुख्य कमावता असल्याचे), अर्जदाराचे आधारकार्ड, बँक खाते तपशील, रहिवासी पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

कुटुंब दारिद्रय रेषेखालील असावे
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी मृत व्यक्ती मुख्य कमावता सदस्य असावा, मृत व्यक्तीचे वय मृत्यूच्या वेळी १८ ते ५९ वर्षे असावे. मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती असावा, सर्व जाती-धर्मातील कुटुंब यासाठी पात्र आहेत.

एकरकमी मिळते मदत – केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे पात्र वारसदारांना एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते. गेल्या वर्षभरात राज्यात अनेक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

कसा व कुठे करायचा अर्ज?
अर्ज तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात, तलाठी कार्यालयात करता येतो. nsap.nic.in किंवा महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करता येतो. अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडावीत.



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.