Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


मुंबईसह देशातील इतर अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो दोन रुपयांची वाढ | CNG Rate Today

CNG Rate Today


Telegram Group Join Now

CNG Rate Today: राज्यातील विधानसभा निवडणूक संपताच मुंबईसह देशातील इतर अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत मात्र तिथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.

CNG Rate In Mumbai

मुंबई (CNG Rate In Mumbai) आणि अन्य शहरांत गॅसपुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लि. ने शुक्रवारपासून (ता. २२) सीएनजीचा दर प्रतिकिलो २.७७ रुपयांनी वाढविला आहे. आता मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो ७७ रुपये झाला आहे.

महानगर गॅस आणि अदानी टोटल गॅस कंपनीने उत्पादन खर्चात २० टक्के वाढ होऊनही गेल्या दोन महिन्यांपासून सीएनजी, स्वयंपाकाचा गॅस यांचा किरकोळ विक्री दर स्थिर ठेवला होता.
दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस कंपनीने दिल्ली वगळता नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि इतर शहरांमध्ये केलेल्या दरवाढीमुळे नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचा दर ७५.०९ रुपये प्रति किलोवरून ८१.७० रुपये आणि गुरुग्राममध्ये ८२.१२ रुपयांवर गेला आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.