Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली सुरू; आता घरबसल्या मिळणार डिजिटल प्रमाणपत्र ! कुठे आणि कसा करायचा अर्ज? | Krida E Pramaan Patra Download

Krida E Pramaan Patra Download


Telegram Group Join Now

Krida E Pramaan Patra Registration

Krida E Pramaan Patra Download: The Directorate of Sports and Youth Services Maharashtra has launched an advanced blockchain-based system called “Krida E-Praman” to streamline and secure the 5% reservation benefits for meritorious sportspersons in government and semi-government jobs across Maharashtra. This innovative platform leverages Blockchain and artificial intelligence to ensure complete transparency, eliminate human interference, and prevent fraudulent certificates. With features like 24-hour digital verification and unique QR code authentication, authorities such as Maharashtra Public Service Commission can instantly validate certificate authenticity. The Krida E-Praman certificate has now been made mandatory for all upcoming government recruitments, making it essential for sportspersons to generate and submit this digital प्रमाणपत्र while applying. Even candidates who previously verified their certificates must reapply through this system to be eligible under the sports quota, ensuring a faster, more reliable, and corruption-free recruitment process.

राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण दिले जाते. मात्र, या आरक्षणाचा लाभघेण्यासाठी पडताळणी प्रमाणपत्रासाठी खेळाडूंना वर्षानुवर्षे क्रीडा कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. खेळाडूंची ही ससेहोलपट थांबवण्यासाठी आणि बोगस प्रमाणपत्रांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे आता पात्र खेळाडूंना पारदर्शकपणे आणि वेळेत न्याय मिळणार आहे.

आरक्षणासाठी प्रमाणपत्राची वैधता – Krida E Pramaan Patra Validity

आवश्यक केवळ क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र असून चालत नाही, तर त्या प्रमाणपत्राची क्रीडा विभागाकडून पडताळणी करून घेणे अनिवार्य असते. हे ‘वैधता प्रमाणपत्र’ असल्याशिवाय खेळाडूला आरक्षणांतर्गत नियुक्ती मिळत नाही. आता ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. अर्जाची स्थिती, त्रुटी आणि मंजुरी या सर्व बाबी खेळाडूला त्याच्या डॅशबोर्डवर आणि एसएमएसद्वारे कळणार आहेत.

प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना – Sports Person 5% Reservation

Sports Person Registartion Process 2026: नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण राज्य शासनाच्या विविध विभागांतील गट ‘अ’ ते ‘ड’ पर्यंतच्या सरळसेवा भरतीमध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी ५ टक्के समांतर आरक्षण लागू आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या राज्यातील गुणवंत खेळाडूंना हक्काची नोकरी मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

Sports Person Registartion Process 2026

Sports Person Registartion Process 2026

कुठे आणि कसा करायचा अर्ज? How To Apply For Krida E Pramaan Patra 

खेळाडूंनी आपल्या क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी [https://sports.maharashtra.g ov.in](https://sports.maharashtra.gov.in) यावर वैयक्तिक माहिती भरा. क्रीडा स्पर्धेचे तपशील अपलोड करा, शुल्काचा भरणा करा, डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त करा.

क्रीडा ई प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची पद्धती :

या प्रणालीअंतर्गत ५% खेळाडू आरक्षणाचे संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख ‘क्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात येत आहेत. या अभिलेखाद्वारे खेळाडू आपले ५% खेळाडू प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊ शकतात, यासाठी आवश्यक असणारा तपशील पुढील प्रमाणे.

  •  खेळाडूंनी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य ज्या खेळाडूंनी अधिकृत स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले आहे, अशा सर्व खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://sports.maharashtra.gov.in/भेट द्यावी.
  • संकेतस्थळावर सर्वात खाली आमच्या सेवा (Our Services) मध्ये ५% Reservation या टॅबमध्ये जाऊन आपली एक वेळ नोंदणी पूर्ण करावी. या नोंदणीकरिता, वैयक्तिक माहिती व ‘क्रीडा ई-प्रमाण’ पोर्टलवर अर्ज या सर्व बाबींसाठी खालील माहिती खेळाडूंनी तयार ठेवावी.
    • १. नोंदणीसाठी खेळाडूंनी आपल्या आधार-संलग्न (Aadhaar-linked) मोबाईल क्रमांकाचा आणि आयडीचा वापर करणे आवश्यक आहे. (Mobile No.)
    • २. स्वतःचा योग्य व दैनंदिन वापर ई-मेल आय.डी. (Email ID)
    • ३. आधार कार्ड पीडीएफ (Aadhar ID pdf format)
    • ४. क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्रावीण्य प्रमाणपत्र (Certificate of the Competition pdf format) ज्या खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहे, त्यांनी तात्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त करून घ्यावे.
  • Click Here For Krida E Pramanpatra Online Application

ब्लॉकचेन आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर – Krida E Pramaan Patra Download

प्रमाणपत्रांमध्ये होणारी फेरफार रोखण्यासाठी या प्रणालीत ‘ब्लॉकचेन’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे प्रमाणपत्राची सत्यता कोणालाही क्यूआर कोडद्वारे क्षणार्धात तपासता येईल.

नोकरीत ५ टक्के आरक्षण; बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा ‘खेळ’ खल्लास ! ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली सुरू; आता घरबसल्या मिळणार डिजिटल प्रमाणपत्र

कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याची गरज नाही यापूर्वी पडताळणीसाठी खेळाडूंना जिल्हा किंवा विभाग स्तरावरील क्रीडा कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता ही प्रक्रिया पूर्णपणे ‘पेपरलेस’ आणि ‘फेसलेस” झाल्याने खेळाडूंचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी हे पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. नवीन प्रणालीमुळे उमेदवारांना हे प्रमाणपत्र मिळवणे सोपे होणार आहे.

बोगस प्रमाणपत्रांना बसणार आळा गेल्या काही वर्षांत बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. ई-प्रमाण प्रणालीमुळे क्रीडा संघटनांनी दिलेल्या माहितीशी अर्जाची पडताळणी थेट होणार असल्याने, बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

स्पर्धेचे अभिलेख उपलब्ध नसल्यास ‘Grievance’ द्वारे करा अर्ज ज्या खेळाडूंची माहिती अभिलेखात किंवा प्रमाणपत्रे तांत्रिक कारणास्तव प्रणालीवर दिसत नसतील, तर [email protected] या ई-मेलवर आपली तक्रार आपल्याकडे असलेल्या क्रीडा प्रमाणपत्रासह नोंदवा. खेळाडूंनी आपले निवेदन सादर करताना खालील बाबींची पूर्तता करावीः आपण सहभागी झालेल्या स्पर्धेचे अचूक नाव व वर्ष नमूद करावे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मूळ क्रीडा प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत निवेदनासोबत जोडावी. असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभाग स्तरावर त्या माहितीची शहानिशा करून सदर अभिलेख पोर्टलवर अद्ययावत करण्याची कार्यवाही केली जाईल. अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in/या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अन्य खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध करुन दिल्यानंतर त्याबाबतची माहिती त्वरीत याद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

महत्वाची सूचना : कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५ ची स्पर्धा), ज्युडो (२०२४ ची स्पर्धा), कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) ह्या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्याच खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. इतर पात्र खेळांच्या खेळाडूंनी नोंदणी करावी, इतर अभिलेख देखील अपलोड करण्याची कार्यवाही सुरु आहे.

Download Krida E Pramanpatra GR 



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.