Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



शेतकऱ्यांना मोठा दिलासा: पीक विम्याच्या पहिल्या हप्त्यापोटी १,२१९ कोटी रुपये मंजूर | Advance Crop Insurance Amount Deposited For Farmers

Advance Crop Insurance Amount Deposited For Farmers


Telegram Group Join Now

Pik Vima Hafta 2026

Advance Crop Insurance Amount Deposited For Farmers:Under the Pradhan Mantri Fasal Bima Yojana, the Maharashtra government has approved a significant crop insurance compensation package of ₹1,219.88 crore for farmers affected by heavy rainfall during the previous Kharif season. This financial relief will benefit farmers across 30 districts, with a major share allocated to soybean cultivators, covering nearly 35 lakh hectares of insured crops. Crops like cotton and tur are expected to be included in the second phase due to delayed harvesting. The compensation is being calculated based on crop cutting experiments, with data from over 7,500 revenue circles already processed, while the remaining assessments are underway. According to Chief Minister Devendra Fadnavis, eligible farmers may receive compensation of up to ₹17,000 per hectare, depending on yield losses, making this initiative a crucial step in supporting farmers and stabilizing agricultural income in the state.

गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत (PMFBY) विमा कंपन्यांनी ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी १,२१९ कोटी ८८ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये:

सोयाबीन उत्पादकांना प्राधान्य: या भरपाईमध्ये सर्वाधिक वाटा सोयाबीन पिकाचा आहे. सोयाबीनचा विमा उतरवलेल्या सुमारे ३५ लाख हेक्टरवरील पिकाला याचा लाभ मिळणार आहे.

कापूस आणि तूर वेटिंगवर: कापूस आणि तूर या पिकांची काढणी उशिरा होत असल्याने, त्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात केला जाईल.

भरपाईचे निकष: ही रक्कम ‘पीक कापणी प्रयोगांवर’ आधारित आहे. राज्यातील सुमारे १२ हजार महसूल मंडळांपैकी ७,५०० मंडळांची माहिती पूर्ण झाली असून, उर्वरित मंडळांची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.

सर्वाधिक मदत: जिल्ह्यांच्या आकडेवारीनुसार, नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक ८,३३७.९७ लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार, उत्पादन कमी आले असले तरी पीक कापणी प्रयोगांच्या आधारे शेतकऱ्यांना हेक्टरी १७,००० रुपयांपर्यंत मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हावार नुकसान भरपाई तपशील (प्रथम टप्पा)

जिल्हामंजूर रक्कम (लाखात)
नांदेड८१,३३७.९७
अहिल्यानगर११,८३५.०४
हिंगोली९,८९५.५६
परभणी६,३७८.०२
गोंदिया३,१०१.७७
ठाणे१,७९३.८२
पालघर१,५३४.७७
वर्धा९६१.८२
नाशिक८७८.७८
सोलापूर६८४.०६
बुलढाणा५६४.९८
एकूण (३० जिल्हे)१,२१,९७८.१८

७,५०० महसूल मंडळांची माहिती झाली पूर्ण

या १२ हजार महसूल मंडळांपैकी सुमारे साडेसात हजार मंडळांची नुकसानभरपाईची माहिती अंतिम झाली. त्यालाविमा कंपन्यांनी सहमती दर्शविल्यानंतर नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारीअखेर असल्याने या उर्वरित पाच हजार मंडळांची माहिती येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे नुकसानभरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा समावेश असून सुमारे ३५ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरविण्यात आला होता.


Advance Crop Insurance Amount Scheme Maharashtra

Advance Crop Insurance Amount Deposited For Farmers : खरीप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून पीक विम्याच्या २५ टक्के आगाऊ भरपाई रकमेचे वाटप आजपासून सुरू झाले आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

खरीप हंगाम २०२४: पीक विम्याच्या २५ टक्के आगाऊ रकमेचे वाटप सुरू

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यानंतर शासनाने या पिकांसाठी नुकसान भरपाई मंजूर केली होती. मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना विम्याच्या आगाऊ रकमेची प्रतिक्षा होती.

जिल्ह्यात एकूण ७ लाख ६३ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक विमा भरला होता. यात ५ लाख २४ हजार २६७ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. सोयाबीनसाठी ३.८५ लाख हेक्टर, कापसासाठी ८९ हजार हेक्टर आणि तुरीसाठी ३५ हजार ५४७ हेक्टर इतक्या क्षेत्रासाठी विमा घेतला गेला होता. यामध्ये एकूण ७ लाख १४ हजार १६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने ३३५.९० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम मंजूर केली असून, ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. मागील काही महिन्यांपासून या मुद्यावरून अनेक शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी निवेदने दिली होती तसेच आंदोलनेही केली होती. अखेर प्रशासनाने ही रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, खरीप हंगामाच्या तयारीसाठी त्यांना बळकटी मिळणार आहे.

कृषी विभाग अनभिज्ञ; १० एप्रिलपासून वाटप प्रक्रिया सुरू | Agrim Pik Vima 2025

खरीप हंगाम २०२४ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मंजूर करण्यात आलेल्या पीक विम्याची आगाऊ रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागली आहे. विमा कंपनीकडून आवश्यक प्रिमियम प्राप्त झाल्यानंतर वाटप प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचे जिल्हा समन्वयकांनी स्पष्ट केले आहे.

या वितरणाबाबत कृषी विभागाने मात्र अजूनही कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी या विषयावर बोलण्यास टाळाटाळ केली असून, त्यामुळे कृषी विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची आगाऊ भरपाई मंजूर झाली आहे, त्यांच्या खात्यावर १० एप्रिलपासून रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. सोयाबीन उत्पादकांसाठी २६८.५९ कोटी रुपये, कापूस पिकांसाठी ५३ कोटी रुपये, तर तूर पिकासाठी १४.१४ कोटी रुपये इतका निधी वितरित केला जाणार आहे.

या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगाम २०२५ च्या तयारीसाठी या रकमेचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तालुकानिहाय पीक विमा वितरणाची रक्कम (रु. कोटीत)

  • परभणी – ₹५८.६९ कोटी
  • जिंतूर – ₹५४.५१ कोटी
  • गंगाखेड – ₹३७.०१ कोटी
  • सेलू – ₹३५.२५ कोटी
  • पूर्णा – ₹३४.०० कोटी
  • सोनपेठ – ₹३०.५६ कोटी
  • पालम – ₹२९.९२ कोटी
  • पाथरी – ₹२९.३० कोटी
  • मानवत – ₹२६.६७ कोटी


अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.