अग्रिस्टॅक योजना: शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळख व योजनांचा थेट लाभ! Agristack Farmer Registration Maharashtra
Agristack Farmer Registration Maharashtra
Agristack Farmer Registration Maharashtra: केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणे स्वतंत्र डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. अग्रिस्टॅक योजना (Agristack Farmer Registration Maharashtra) या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना डिजिटल सेवांचा वापर करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे यामागचा उद्देश आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पातळीवर माहिती गोळा केली जात आहे आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
अग्रिस्टॅक योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांना सर्वसमावेशक डिजिटल सेवा पुरविण्यासाठी कृषी मंत्रालयाने ही योजना तयार केली आहे. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी या संदर्भातील आदेश जारी करण्यात आले. महसूल विभागाकडे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या व त्यांच्या जमिनीच्या डेटा आधारे फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यात येईल. हा क्रमांक शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडला जाईल.
केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाद्वारा राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ एकत्रितपणे देण्यासाठी अग्रिस्टॅक हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे व तसे आदेश दि. १४ ऑक्टोबरला जारी करण्यात आले आहेत. आचारसंहितेपश्चात या योजनेची लगबग वाढली आहे. महसूल विभागाकडे नमूद शेतकऱ्यांची नावे, त्यांची शेती या डेटाबेसचा वापराद्वारे शेतकऱ्यांची ओळख पटविणारा आधार क्रमांक व त्याआधारे फार्मर आयडी देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा उभारणे हा अग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. सातबाराचे संगणकीकरण व रिमोट सेसिंग पद्धतीने जमिनीचे भू-संदर्भीकरण झालेले आहे. या सेवा डिजिटाइज स्वरूपात उपलब्ध होत आहे. राज्यात गतवर्षी बीड जिल्ह्यात पथदर्शी स्वरूपात हा प्रकल्प राबविण्यात आला. आता त्याची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
गावनिहाय पथकांद्वारे अंमलबजावणी या उपक्रमासाठी गावनिहाय पथके तयार करण्यात येणार आहे. त्यात तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांचा समावेश राहणार आहे. प्रत्येक गावात है पथक तीन दिवस मुक्कामी राहील, योजनेची प्रचार- प्रसिद्धी करून शेतकरी ओळख क्रमांक तयार करेल.
अग्रिस्टॅकची ही आहेत वैशिष्ट्ये शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ एकत्रितपणे मिळेल. स्वस्त कर्ज, कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक व तंत्र मार्गदर्शन उपलब्ध होईल, उच्च गुणवत्तेचा डेटा व अॅग्री टेकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना राबविण्यात येणार आहे.