Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



बुलेट ट्रेन भरती अंतर्गत 237 पदांसाठी भरती जाहीर. पात्रता, वेतन, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.Bullet Train Vacancy 2026


Telegram Group Join Now

Bullet Train Vacancy 2026

Bullet Train Vacancy 2026: बुलेट ट्रेन भरती ची जाहिरात आलेली आहे. भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पात काम करण्याची संधी शोधणाऱ्या तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने विविध गैर-कार्यकारी (Non-Executive) पदांसाठी भरती जाहीर केली असून, एकूण 237 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2026 आहे.

Bullet Train Vacancy 2026: मुंबई आणि अहमदाबादला जोडणारा बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांपैकी एक मानला जातो. या प्रकल्पासाठी अनुभवी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, रेल्वे, मेट्रो किंवा तत्सम क्षेत्रात कार्यरत असलेल्या पात्र उमेदवारांना ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तरी सर्व उमेदारानी या भरती साठी अर्ज करावे.

NHSRCL Bullet Train Recruitment 2026 Overview

ParticularsDetails
OrganizationNational High Speed Rail Corporation Limited (NHSRCL)
ProjectMumbai-Ahmedabad High Speed Rail (Bullet Train)
Post NameNon-Executive (Technical Posts)
Total Vacancies237
Application ModeOnline
Educational QualificationITI / Apprenticeship / 3-Year Diploma in Relevant Engineering Trade
Experience RequiredMinimum 2 Years
Maximum Age Limit35 Years (As on 30 June 2026)
Selection ProcessComputer Based Test (CBT), Document Verification & Medical Examination
Salary₹35,000 – ₹1,10,000 (NE-2 Pay Scale)
Application Fee₹400 (General/OBC/EWS), SC/ST & Women – Nil
Last Date to Apply05 August 2026
Official Websitewww.nhsrcl.in

NHSRCL Bullet Train Recruitment 2026

NHSRCL Bullet Train Bharti 2026: पदांचा तपशील

बुलेट ट्रेन भरती अंतर्गत विविध तांत्रिक विभागांमध्ये एकूण 237 पदे उपलब्ध आहेत.

सिव्हिल आणि ट्रॅक विभाग

या विभागात फिटर, मेकॅनिक, ड्राफ्ट्समन, सर्व्हेअर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, प्लंबर आणि पेंटर अशा विविध ट्रेडमधील पदांची भरती केली जाणार आहे.

इलेक्ट्रिकल विभाग

इलेक्ट्रिकल विभागात सर्वाधिक म्हणजे 77 पदे उपलब्ध असून या विभागासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

सिग्नलिंग आणि टेलिकॉम विभाग

या विभागात 63 रिक्त पदे असून आधुनिक रेल्वे सिग्नलिंग आणि दूरसंचार व्यवस्थेशी संबंधित अनुभवी उमेदवारांना संधी मिळणार आहे.

रोलिंग स्टॉक विभाग

या विभागात फिटर, मेकॅनिक/मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन आणि RAC या ट्रेडमधील विविध पदे भरली जाणार आहेत.

बुलेट ट्रेन भरती शैक्षणिक पात्रता

अर्जदाराने संबंधित ट्रेडमध्ये ITI, Apprenticeship किंवा Civil, Mechanical, Electrical किंवा Electronics Engineering मधील 3 वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

महत्त्वाची बाब म्हणजे, फक्त BE किंवा B.Tech पदवीधारक असून ITI किंवा डिप्लोमा नसलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी पात्रता मिळणार नाही.

बुलेट ट्रेन भरती अनुभव आणि वयोमर्यादा

उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच 30 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

बुलेट ट्रेन भरती साठी कोण अर्ज करू शकतो?

बुलेट ट्रेन भरती Absorption Basis वर होत असल्यामुळे सर्वसामान्य उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. सध्या भारतीय रेल्वे, सरकारी रेल्वे उपक्रम, विविध मेट्रो रेल्वे संस्था किंवा RRTS च्या ऑपरेशन व मेंटेनन्स विभागात नियमित अथवा करार तत्त्वावर कार्यरत असलेले कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वेतन आणि सुविधा – Mumbai Ahmedabad Bullet Train Jobs

निवड झालेल्या उमेदवारांना NE-2 वेतनश्रेणी अंतर्गत ₹35,000 ते ₹1,10,000 पर्यंत वेतन दिले जाईल. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, भविष्य निर्वाह निधी (PF), ग्रॅच्युइटी, वैद्यकीय सुविधा आणि कंपनीच्या नियमानुसार इतर भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल.

  • संगणक आधारित परीक्षा (CBT)
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

अर्ज शुल्क

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्ग: ₹400
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उमेदवार: अर्ज शुल्क माफ

बुलेट ट्रेन भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

अधिकृत संकेतस्थळ – NHSRCL Bullet Train Recruitment 2026

भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती, पात्रता, रिक्त पदांचा तपशील आणि ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी NHSRCL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.