Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Can Government Employees Do Trading – सरकारी कर्मचारी शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतात का ?


Telegram Group Join Now

Can Government Employees Do Trading

Can Government Employees Do Trading: With the help of the stock market even a common man can get shares in big companies. But the stock market is a place where many people make money and many people lose their money. The stock market carries financial risk, so are advised to do long-term trading. Only those who are willing to take risks should invest in the stock market. It is said that If not, stay away from the share market. The stock market is monitored by government authorities like SEBI. Now there is more transparency than before. By this post, one can know that Can Government Employees Do Trading?

ऑफर करत असलेल्या नोकरीच्या सुरक्षिततेमुळे आणि संबंधित भत्ते आणि फायद्यांमुळे भारतातील सरकारी नोकऱ्यांना खूप मागणी आहे. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींनाही निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळू शकतो. तथापि, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना चांगल्या वेतनश्रेणीचा लाभ मिळत नाही आणि त्यामुळे ते गुंतवणुकीद्वारे उत्पन्नाचे पर्यायी स्रोत शोधत असतील. असेच एक मार्ग जे अनेक सरकारी कर्मचारी अनेकदा शोधतात ते म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करणे.

Can Government employees trade in stock markets?

केलेली बचत आणखी वाढावी, ते पैसे आणखी कोणत्यातरी आकर्षक योजनेत गुंतवावे, मिळालेल्या फायद्यातून आलिशान घर किंवा कार घ्यावी, असे स्वप्न सर्वांनाच वाटते. यामुळे शेअरबाजारात गुंतवणुकीत हल्ली अनेकजण रस दाखवू लागले आहेत. यात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. डीमॅट अकाउंटची संख्या वेगाने वाढत आहे. पैसे वाढवण्याची अशीच संधी सरकारी कर्मचाऱ्यांना असते का? ते या पर्यायाचा अवलंब करू शकतात का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. ते रास्तही आहे. याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना काही बंधनांचे पालन करावे लागते. घरात एखादा सरकारी कर्मचारी असेल तरी इतरांना काही गोष्टींचे पालन करावे लागते.

सट्ट्यात सहभागास मनाई : केंद्रीय नागरी सेवा (आचार) नियम, १९६४ कलम ३५ अ नुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला शेअर्स किंवा इतर प्रकारच्या सट्टा बाजारात पैसे लावता येत नाहीत. फायद्यासाठी सतत शेअर्स घेणे आणि विकणे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगी नाही.

काय आहे नियम: – New rule for investing in stock market for Govt Employees 

सरकारी कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात का ? याचे उत्तर हो असेच आहे मात्र यासाठी त्यांना काही नियमांचे पालन करावे लागते. सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी काही निर्बंध लावले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय नागरी सेवा (आचार) नियम, १९६४ कलम ३५ अ नुसार, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला शेअर्स किंवा इतर प्रकारच्या सट्टा बाजारात पैसे लावता येत नाहीत. म्हणजे फायद्यासाठी सतत शेअर्स घेणे आणि विकणे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगी दिलेली नाही.

पण, सरकारी कर्मचाऱ्यांना लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट साठी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास मुभा देण्यात आली आहे.ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना लॉन्ग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करायची असेल त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची मुभा या ठिकाणी देण्यात आली आहे.

परंतु नोकरीमध्ये असताना ज्या कंपनीत सदर कर्मचाऱ्यांने गुंतवणूक केली असेल त्या कंपनीसोबत असलेले हितसंबंध कामाच्या आड येऊ नये याची काळजी कर्मचाऱ्याला घ्यावी लागते. तसेच काही कंपन्यांचे शेअर्स केवळ संचालकांसाठी राखीव असतात असे शेअर्स देखील सरकारी कर्मचाऱ्यांना विकत घेता येत नाहीत.

याशिवाय शेअर बाजारात गुंतवणुकीसंदर्भात सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला तसेच सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना एखाद्या सरकारी कंपनीचा आयपीओ, फॉलो अप ऑफरमध्ये किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शेअरविक्रीच्या प्रक्रियेत सहभागी होता येत नाही.

एवढेच नाही तर काही सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर बाजारात केलेल्या 50,000 रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची आणि काही कर्मचाऱ्यांना 25000 रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची माहिती देखील द्यावी लागते.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.