Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


निवृत्तिवेतन योजना पुन्हा सुरू; ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना २५०० रुपये पेन्शन | Delhi Old Age Pension Scheme

Delhi Old Age Pension Scheme


Telegram Group Join Now

Delhi Old Age Pension Scheme: दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दरमहा अडीच हजार रुपये देणारी वृद्धत्व निवृत्तिवेतन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील आणखी ८० हजार ज्येष्ठ नागरिकांना ही योजना लागू होणार असून निवडणुकीआधी या आर्थिक मदतीचा दिल्लीकर ज्येष्ठांना थेट लाभ मिळेल.

दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी समन्वयक आणि अरविंद केजरीवाल यांनी आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आणखी ८० हजार ज्येष्ठ नागरिकांना वृद्धत्त्व निवृत्तिवेतन योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली. या योजनेमुळे एकूण पाच लाख ३० हजार ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ मिळणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. केजरीवाल म्हणाले, “२०१५ मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही निवृत्तिवेतनात वाढ केली होती. रविवारपासून याबाबतचे पोर्टल कार्यान्वित झाले असून १०,००० हुन अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत

दिल्लीत ६० ते ६९ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना २००० रुपये तर ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना २५०० रुपये पेन्शन मिळते. मी तुरुंगात गेल्यानंतर ही योजना बंद झाली होती. आता पुन्हा सुरू होत आहे.”

भाजपच्या डबल इंजिनची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये वृद्धांना केवळ ५००-१००० रुपये निवृत्तिवेतन मिळते. दिल्लीच्या सिंगल इंजिन सरकारद्वारे वृद्धांना २५०० रुपये दिले जातील. भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे होणारे नुकसान अधिक असल्याने दिल्लीच्या लोकांसाठी सिंगल इंजिन सरकारच योग्य आहे.
– अरविंद केजरीवाल, समन्वयक, ‘आप



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.