आज लाडक्या बहिणींना दुसरा हफ्ता मिळणार! ५० हजार बहिणींची आज महासभा आयोजित! – Ladki Bahin 2nd installment
Ladki Bahin 2nd installment

रेशीमबाग मैदानावर शनिवारी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित – करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व – नागरी भागातून तब्बल ५० हजार महिला या – विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासाठी जवळपास ८६८ बसेसची व्यवस्था कार्यक्रमाला होणारी गर्दी विचारात घेता शहरातील अनेक मार्गावर पूर्णपणे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे, तर काही मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे प्रामुख्याने उपस्थित राहतील. संपूर्ण प्रशासनातर्फे याची तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. ही सर्व मंडळी वाहनांनी रेशीमबाग मैदानावर येतील. या बसेससाठी वाहन पार्किंगची जागा लोहमार्ग मुख्यालय मैदान, राजाबाक्षा मैदान, गणेशपेठ बस डेपो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.
Maze paise ajun ale nhi