Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


̨लाडकी बहीण-२३ लाख ४० हजार महिलांचे आधार संलग्नच नाही, तुमचे स्टेट्स जाणून घ्या!

LADKI Bahin DETAILS


Telegram Group Join Now

सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना खूप गाजत आहे. सध्या राज्यात २ कोटी ५२ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झाली आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी अखेरच्या दिवसापर्यंत २ कोटी ५२ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. २३ लाख ४० हजार महिलांचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने १५०० रुपयांचा लाभ मिळाला नाही. त्यांच्या घरी जाऊन आधार संलग्न करण्याच्या सूचना महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना दिल्या. महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते. ३० सप्टेंबरअखेर २ कोटी ४१ लाख ३५ हजार ६५७ अर्जाना मान्यता देण्यात आली असून, ज्या महिलांचे आधार बँक खात्याशी संलग्न नाही त्यांना आधार जोडण्याच्या सूचना देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या घरी पाठवा, अशी सूचना तटकरे यांनी केली.

Ladki-Bahin-Yojana-Updates

 

Ladki Bahin Yojana Re Application

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे वा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व १. महिला २. समूह संसाधन व्यक्ती ३. बचत गट अध्यक्ष ४. बचतगट सचिव ५. गृहिणी ६. अंगणवाडी सेविका/मदतनीस ७. ग्रामसेवक ८. वॉर्ड अधिकारी ९. सेतू १०. बालवाडी सेविका ११. आशा सेविका १२. पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) १३. CMM2 १४. मदतकक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की, नारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापूर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे Aprroved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुद्धा पाहता येतील.

Can I Apply Again For Ladki Bahin Yojana From Nari Shakti App

सर्व संबंधितांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल, याची नोंद घ्यावी. असे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना जिल्हा समन्वय अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
  1. सुनंदा दिलीप शिरसाट says

    आम्हाला एक ही हफ्ता आला नाही आहे

Leave A Reply

Your email address will not be published.