लाडकी बहीण योजनाच्या हमीपत्रात हि काळजी घ्या, नाहीतर अर्ज होईल बाद! – Ladki Bahin Yojana Hamipatra

Ladki Bahin Yojana Hamipatra Download


Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Hamipatra PDF 

Ladki Bahin Yojana Hamipatra Details –  The state government has announced Chief Minister Ladki Bahin Yojana. Women in the age group of 21 to 65 can avail this scheme, and 1500 rupees will be deposited in their account every month. Therefore, women and girls have started applying to benefit from this scheme. Meanwhile, while applying for Majhi Ladki Bahin Yojna (Majhi Ladki Bahin Yojna), the female applicant has to give an undertaking. What exactly is this in the guarantee (Self Certificate)? And how exactly to fill and upload this guarantee? Let’s find out

मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अर्जाच्यासोबत हमीपत्र देखील जोडण्यात आलं आहे. या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणं बंधनकारक असणार आहे जे लक्षात ठेवा.  तसेच महत्वाचे म्हणजे हे हमीपत्र वाचलं तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात. या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळेल त्यांच्यासाठी विविध अटी ठेवण्यात आल्या आहेत. यातील महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याजोगी  अट म्हणजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षित उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं. संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसावा. महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावं. तसेच महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेचा 1500 पेक्षा जास्त रुपयांचा आर्थिक लाभ घेतलेला नसावा. या सर्व अर्जाच्या हमीपत्रातून स्पष्ट होत आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र होणे तितके सोपे नाहीत. कारण प्रत्येक नियम या अर्जात पाहिले जाणार आहेत. नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे.

Important Links For Ladki bahin Scheme Maharashtra

Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra Pdf 2024 Maharashtra

  • १. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
  • २. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं हमीपत्र वाचा जसं आहे तसं | ladki bahin yojana hamipatra pdf

  • मी घोषित करते की…
  • माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक नाही,
  • माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
  • मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमितर/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किया राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा समानिवृतीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
  • मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रु.१,५००/- पेक्षा जास्त रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किया माजी खासदार/आमदार नाही.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपरिशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.
  • माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही.
  • माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.
  • मी वरीलप्रमाणे घोषित करते की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना संबंधित पोर्टल अॅपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रीक किंवा यतः टाइम पीन (OTP) माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करु शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई-केवायसी (e-KYC) वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे.
  • (अर्जदाराची सही)

How To Upload Ladki Bahin Yojana Hamipatra लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र कसं करायचं अपलोड?

माझ्या कुटुंबाचे एकत्रिक वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रूपयांपेक्षा अधिक नाही.
माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी.
माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
मी स्वत: किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियम/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही.
मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी/ स्वयंसेवी कामगार/ कंत्राची कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
माझ्या कुटुंबातील सदस्य विद्ममान किंवा माजी खासदार/ आमदार नाही.
माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरेशन/ बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत.
माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.
माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.
या हमीपत्रातील 10 मुद्दे वाचून तुम्हाला त्याच्यासमोर दिलेल्या बॉक्समध्ये बरोबरची खूण करायची आहे. तसेच त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि सही करायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या हमीपत्राचा फोटो काढून तो नारीशक्ती दूत अॅपमधील अर्जदाराच्या हमीपत्राच्या कॉलममध्ये अपलोड करायचा आहे.

Ladki Bahin Yojana Hamipatra Overview | majhi ladki bahin yojana hamipatra pdf download

Scheme NameLadki Bahin Yojana Hamipatra
Initiated ByChief Minister Eknath Shinde
StateMaharashtra
Year2024
Beneficiariespoor and destitute backgrounds in the state
BenefitsFinancial assistance provided monthly
Amount₹1500 per month
Application ProcessOnline and offline
Start Date of Scheme1 July 2024
Last Date to Submit Mazi Ladki Bahin Yojana Form15 August 2024.

नोट-माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र pdf

  • १. उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरीता आहे.
  • २. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ठ झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS/ व्हाट्स अॅप द्वारे सुद्धा पाठविण्यात येईल.
  • अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी.

Majhi ladki bahin yojana hamipatra pdf download



अन्य महत्वाचे जॉब बघा..
9 Comments
  1. Akash suravase says

    गरीब लोकांना मदत होईल का

  2. सुनील काळे says

    हमी पत्राच्या ठिकाणी कोणते कागदपत्र अपलोड करावे

  3. सुनील काळे says

    नारीशक्ती दूध आपलिकेशन मधून फॉर्म भरते वेळेस निलंगा तालुका का येत नाही

  4. Nishant says

    अर्जदाराचे हमीपत्र manje kay

  5. Rama sanjay ghangale says

    Nahi maje

  6. शामली संदिप उईके says

    लाडकी बाईन योजना आम्हाला गरिब लोकाना नकी द्या सर

  7. Admin says

    Know process of uploading hamipatra

  8. दत्तात्रय चंद्रकांत शिंदे says

    माझा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जातीच्या दाखल्याच्या जागेवर हमीपत्र भरले गेल्यामुळे रिजेक्ट झाला आहे तरी तो मला पुन्हा भरायचा आहे मदत करा

  9. Pooja says

    मी अर्ज १० जुलै रोजी केलं आहे. अजून मला कोणताही sms आला नाही. काय करू?

Leave A Reply

Your email address will not be published.