‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी विविध ठिकाणी ३५ केंद्रे, आपल्या शहरात कुठे फॉर्म भराल! – Ladki Bahin Yojana Kendra
Ladki Bahin Yojana Kendra Location
Majhi Ladki Bahin Yojana Kendra List
Ladki Bahin Yojana Kendra – राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ई-सेवा केंद्रांना तहसील कार्यालयामार्फत परवानगी दिली जात आहे Ladki Bahin Yojana Kendra Location Near You, Form Filling Centers. नाशिक शहरात आतापर्यंत ३५ केंद्रांना परवानगी देण्यात आली असून, अजूनही प्रस्ताव प्राप्त होत असल्याने केंद्रांची संख्या वाढणार आहे. नाशिक शहरासह नाशिक तालुक्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी ई-सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच, रेशन कार्डमधील नाव कमी करणे किंवा समाविष्ट करण्यासाठी नाशिक तहसील कार्यालयाने एक खिडकी योजना सुरू केली आहे. त्याठिकाणी महिला त्यांची नावे समाविष्ट करीत आहेत. कागदपत्रांचा कुठलाही अडसर येऊ नये, यासाठी शहरात विभागनिहाय ई-सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Ladki Bahin Yojana Arj Kendra
त्यांच्यामार्फत अर्ज भरले जात असल्यामुळे तहसील कार्यालयावरील कामाचा ताण हलका झाला आहे. ई-सेवा केंद्र चालकांना अर्ज भरण्याचे दरपत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय दाखले व रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, रेशनकार्ड काढणे यांसारखी कामे करण्यासाठी गर्दी वाढली आहे. डोमिसाइल, उत्पन्नाचा दाखला व रेशनकार्ड काढण्यासाठी ५०० ते १००० रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शर्मा यांनी बैठकीचे आयोजन करीत संबंधित यंत्रणेला कारवाईचे आदेश दिले. शहरातील नागरिकांसाठी प्रत्येक विभागात ई-सेवा केंद्रांना परवानगी दिली जात आहे. महिलांच्या नाव नोंदणीसाठी लूट सुरू असल्याचे आढळल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे.
तहसील कार्यालयात आल्यानंतर सहजपणे काम व्हावे यासाठी एक खिडकी योजना सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीचे काम आहे, अशाच व्यक्तींना तहसीलच्या आवारात प्रवेश देण्यात आला. या संदर्भात काम नसलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे दलालांना शुक्रवारी (दि. ५) प्रवेशच मिळाला नाही. नाशिक तहसील कार्यालयाकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत शुक्रवारी एका महिलेचा अर्ज प्राप्त झाला आहे.
- Nari Shakti App Download – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अर्ज प्रक्रिया सुरू, अँप वरून असा करता येणार अर्ज
- माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करा! -Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download
- Maharashtra Ladki Bahin Yojana – नारी शक्ती दूत अॅप’वर आता महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’ !! महिलांना प्रतिमहिना १२०० ते १५०० रुपये मिळणार
- माझी लाडकी बहीण योजनेस अर्ज करताय, आपल्या सर्व प्रश्नांनची उत्तरे! – Mazi ladki bahin yojana FAQ
Kay nahi
अर्ज कसा करायचा
लग्न झालेल्या मुलींना म्हणजे महाराष्ट्रात जन्म आणी लग्न कर्नाटकं मध्ये अस्यांना काही लाभ मिळेल की नाही यांना .आणी शेती उतारे रेशनकार्ड आधारकार्ड सगळं महाराष्ट्रातलं असलं तरी ही काय लाभ होणार नाही काय
Ladki bahin yojana yancha form bharayacha ahe
नही
Ye yojenase heme ka milega?