माझी लाडकी बहीण योजना रद्द होणार? कोर्टातील याचिकेवर ऑक्टोबरमध्ये होणार सुनावणी!
Ladki Bahin Yojana Stay Petition
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसह मोफत लाभ अदा करणाऱ्या विविध योजनांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होती. परंतु, वडपल्लीवार व सरकारने सुनावणी तहकूब करण्याची विनंती केल्यामुळे येत्या ३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली.
- महत्वाचा अपडेट! – लाडकी बहीणचा दुसऱ्या हफ्त्याची यादी पहा, अनेक बहिणींना…
- माझी लाडकी बहीण योजनेची हेल्पलाईन, व्हॉटसअप वरून करा संपर्क
नागरिकांना मोफत लाभ अदा करणाऱ्या योजनांमुळे राज्याचे आर्थिक आरोग्य खराब होते, सध्या राज्यामध्ये लाडकी बहीणसह मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, पिंक ई-रिक्षा योजना, शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, पुण्यश्लोक अहल्यादेवी स्टार्टअप इत्यादी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व योजनांवर दरवर्षी ७० हजार कोटी रुपयांवर रक्कम खर्च होणार आहे. करिता, या योजना रद्द करण्यात याव्या, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.