लेक लाडकी योजना: मुलींच्या शिक्षणासाठी सरकारकडून ₹1.01 लाखांचा लाभ; मुंबईतील 3,563 मुलींना मिळणार फायदा | Ladki Lek Yojana Latest Update
Ladki Lek Yojana Latest Update
Table of Contents
Ladki Lek Yojana Latest Update 2026
मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांचा जन्मदर वाढविणे, शिक्षणाला चालना देणे तसेच बालविवाह, कुपोषण आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून ‘लेक लाडकी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मुंबई शहरातील 671 आणि मुंबई उपनगरातील 2,892, अशा एकूण 3,563 लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे.
1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी योजना लागू
राज्य शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री (सुधारित)’ योजना अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून ‘लेक लाडकी योजना’ सुरू केली. मुलींच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाला आर्थिक मदत देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ही योजना पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना लागू आहे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा जास्त नसावे.
| लाभाचा टप्पा | मिळणारी रक्कम |
|---|---|
| मुलीच्या जन्मानंतर | ₹5,000 |
| इयत्ता 1लीमध्ये प्रवेश | ₹6,000 |
| इयत्ता 6वीमध्ये प्रवेश | ₹7,000 |
| इयत्ता 11वीमध्ये प्रवेश | ₹8,000 |
| वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर | ₹75,000 |
| एकूण लाभ | ₹1,01,000 |
मुलीला मिळणार एकूण ₹1 लाख 1 हजारांचा लाभ
लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र मुलीला शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते. मुलीच्या जन्मापासून वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण ₹1,01,000 इतका लाभ टप्प्याटप्प्याने देण्यात येतो.
अंतिम ₹75,000 चा लाभ मिळण्यासाठी मुलीने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असणे आणि ती अविवाहित असणे आवश्यक आहे.
कोणत्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल?
1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास संबंधित मुलगीही योजनेसाठी पात्र राहते.
याशिवाय लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे आणि कुटुंबाकडे पात्र पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असणे गरजेचे आहे.
पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी तसेच दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पात्र मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्मदाखला आणि जन्मनोंदणीची माहिती घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा.
आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्यामार्फत लाभार्थीची पात्रता आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर लाभार्थीची माहिती ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदवून संबंधित स्तरावर प्रमाणित केली जाते. पात्रता निश्चित झाल्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने आर्थिक लाभ देण्यात येतो.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करताना साधारणपणे खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:
- मुलीचा जन्मदाखला
- मुलीचे आधार कार्ड
- पालकांचे आधार कार्ड
- पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका
- कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
- लाभार्थी मुलगी किंवा पालकांच्या बँक पासबुकची प्रत
- संबंधित शैक्षणिक टप्प्यासाठी शाळेचा बोनाफाईड दाखला
- लागू असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
- अंतिम लाभासाठी मुलगी अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र
- शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेली इतर आवश्यक कागदपत्रे
- अंगणवाडी सेविकांकडून मार्गदर्शन
पात्र मुली योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पालकांना अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन आणि सहकार्य करीत आहेत. त्यामुळे पात्र पालकांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधून योजनेची पुढील प्रक्रिया जाणून घ्यावी.
अधिक माहितीसाठी
लेक लाडकी योजनेची अधिकृत माहिती आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Ladki Lek Yojana Latest Update: The ‘Lek Ladki’ Scheme is a flagship initiative by the Government of Maharashtra aimed at improving the female birth rate and empowering girls through financial support. Effective for girls born after April 1, 2023, the scheme specifically benefits families holding Yellow and Orange ration cards. It provides a total financial assistance of ₹1,01,000, distributed in five stages from birth until the girl reaches 18 years of age. By linking financial aid to educational milestones, the scheme ensures that girls receive proper schooling and a secure foundation for their future.
‘लेक लाडकी’ योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्त्वाची योजना असून, तिचा मुख्य उद्देश मुलींचा जन्मदर वाढवणे आणि त्यांना शिक्षणासाठी आर्थिक बळ देणे हा आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू असून, पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांना याचा लाभ घेता येतो. या योजनेद्वारे मुलीच्या जन्मापासून ती १८ वर्षांची होईपर्यंत पाच टप्प्यांत एकूण १ लाख १ हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘लेक लाडकी’ योजना: सद्यस्थिती आणि फायदे
मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, सध्या प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक मुली या लाभापासून वंचित आहेत.
📌 जिल्ह्याची सद्यस्थिती
एकूण पात्र मुली: ४,१२१
मंजुरी मिळालेले लाभार्थी: १,२२२
प्रतीक्षेत असलेल्या मुली: १,२६६
अडथळा: कागदपत्रांची पडताळणी संथ गतीने होणे आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक पालकांना अजूनही योजनेचे पैसे मिळालेले नाहीत.
💰 योजनेतून किती आणि कसा मिळणार पैसा?
पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपये मिळतात:
‘लेक लाडकी’ योजना: आर्थिक लाभाचा तपशील
| टप्पा | कधी मिळणार? | मिळणारी रक्कम (₹) |
|---|---|---|
| १ ला टप्पा | मुलीचा जन्म झाल्यावर | ५,०००/- |
| २ रा टप्पा | इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर | ६,०००/- |
| ३ रा टप्पा | इयत्ता सहावीत प्रवेश घेतल्यावर | ७,०००/- |
| ४ था टप्पा | इयत्ता अकरावीत प्रवेश घेतल्यावर | ८,०००/- |
| ५ वा टप्पा | वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर | ७५,०००/- |
| एकूण मिळणारा लाभ | १,०१,०००/- | |
– कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आवश्यक
अनेक ठिकाणी योजनेच्या पुढील हप्त्यांसाठी आवश्यक असणारे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र नसणे किंवा अन्य तांत्रिक त्रुटींमुळे लाभार्थी लाभाच्या रांगेत अडकले आहेत.
-योजनेचे स्वरूप आणि लाभ
‘लेक लाडकी’ योजनेंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ती १८ वर्षाची होईपर्यंत टप्याटप्याने एकूण १ लाख १ हजार रुपये दिले जातात. यामध्ये मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, पहिल्या प्रवेशावेळी ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशी आर्थिक मदत दिली जाते.
-लाभ मिळण्यात येणारे मुख्य अडथळे
अनेक मुलींचे अर्ज मंजूर न होण्यामागे खालील कारणे समोर आली आहेत:
१. कुटुंब नियोजन प्रमाणपत्र: पुढील हप्त्यांसाठी हे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे, जे अनेकांकडे नाही.
२. बँक खाते लिंक नसणे: बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्याने पैसे जमा होण्यात अडचण येत आहे.
३. अपूर्ण कागदपत्रे: अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसणे.
४. प्रशासकीय विलंब: कार्यालयांकडून अर्जांची तपासणी उशिरा होत असल्याने पालकांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत आहेत.
महत्त्वाची टीप: जर तुमच्या घरात १ एप्रिल २०२३ नंतर मुलगी जन्माला आली असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असेल, तर तात्काळ सर्व कागदपत्रांसह बालविकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधा.
मुलींना मिळणार आता एक लाख रुपये- लेक लाडकी योजना ग्रामीण भागात सुरू!
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचा जन्मदर वाढावा, तिच्या शिक्षणास चालना मिळावी, बालविवाह थांबावेत, मुलींचे कुपोषण कमी व्हावे, आदी बाबींचा विचार करीत सरकारने ‘लेक लाडकी योजना सुरू केली. यांतर्गत अंगणवाडी सेविका घरोघरी जनजागृती करीत आहेत. आता मुलगी झाल्यास पालकांवरील बोजा कमी करून तिला १८ वर्षे वयापर्यंत एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे. १ एप्रिल २०२३पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेंतर्गत एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात शासनस्तरावरून प्रचार व प्रसार केला जात आहे. यासाठी अंगणवाडी सेविका परिश्रम घेत आहेत. अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून ‘लेक लाडकी योजने’ची जनजागृती केली जात आहे. माहितीसाठी अंगणवाडी केंद्र, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधता येईल.

असा मिळणार लाभ? पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, १२वीत गेल्यावर आठ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रीतीने एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
कुटुंब नियोजन प्रमाणपत्र ■ १ एप्रिल २०२३ नंतर जन्मणाऱ्याा एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगा किया दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. कोणती लागणार कागदपत्रे ? ■ जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेराक्स, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, दाखला आदी कागदपत्रे लागणार आहेत. अंगणवाडी सेविकेकडे करा अर्ज ! ■ या अर्जात वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाइल नंबर, अपत्याची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. अर्ज भरून आला की, अंगणवाडी सेविकेकडून पोहोचपावती घ्यायची आहे.



Kasa bharava form online ka