RTE साठी त्वरित करा अर्ज, प्रवेशासाठी आज अखेरची संधी, लिंक बंद होणार !! – Last Date for RTE Admission Today!!
Last Date for RTE Admission Today

शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातून ६०,९८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, प्रवेशासाठी अंतिम मुदत आज, सोमवार (१० मार्च Last Date for RTE Admission Today) संपत आहे. यंदा १,०१,९६७ विद्यार्थ्यांची निवड यादीत निवड झाली होती, परंतु आतापर्यंत केवळ ६०,००० प्रवेशच निश्चित झाले आहेत. त्यामुळे उर्वरित रिक्त जागांसाठी मुदतवाढ मिळणार का? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाने १० मार्चपर्यंत प्रवेशाची मुदत दिली होती. मात्र, हजारो विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही. यंदा ८,८६३ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली होती आणि १,०९,०८७ जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. ३,०५,१५२ अर्ज प्राप्त झाल्यानंतर १,०१,९६७ विद्यार्थ्यांची निवड यादीत तर ८५,४५७ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीत निवड झाली होती. सुरुवातीला १४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रवेशाची संधी देण्यात आली होती. मात्र, त्या कालावधीत केवळ ४६,००० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
गेल्या १० दिवसांत केवळ १५,००० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शिक्षण विभागाने यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू केली. मात्र, अनेक जागा रिक्त राहिल्याने पालकांनी आरटीई प्रवेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे. मात्र, पालकांकडे मूळ कागदपत्रे नसल्याने किंवा नवीन कागदपत्रांसाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केल्याने अनेक पालकांना निर्धारित वेळेत प्रवेश घेता आलेला नाही.