Lek Ladki Yojana Beneficiary Status – ‘लेक लाडकी’ योजनेचा पहिला ५ हजारांचा हप्ता वितरित
Lek Ladki Yojana Hafta Online
Table of Contents
Lek Ladki Yojana Beneficiary Status Check
Lek Ladki Yojana Beneficiary Status: ‘बेटी पढाओ बेटी पढाओ’साठी मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाकडून ‘लेक लाडकी’ ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर ते १८ वर्षांची झाल्यानंतरपर्यंत एकूण १.०१ लाख रुपये मिळणार आहे. . तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर तीन हजारांहून अधिक पालकांनी महिला व बाल कल्याण विभागाकडे अर्ज सादर केले असून, पहिल्या हप्त्याची अर्थात पाच हजारांची रक्कमही ३१८ जणींच्या खात्यावर जमा झाली. तर ६०० ‘लेकी’च्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
राज्य शासनाकडून एक एप्रिलपासून ही योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतील लाभाची रक्कम लाभार्थ्यांना ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी)द्वारे थेट बँक खात्यात देण्यात येत आहे. १ एप्रिल २०२३ नंतर एक मुलगी व मुलगा आहे.
Lek Ladki Yojana Eligibility
त्यांना ही योजना लागू आहे. यासह ज्यांना एकच मुलगी आहे. दोन्ही मुली आहेत, असे कुटुंबीय या योजनेस पात्र ठरणार आहेत. या ‘लेक लाडकी’ योजनेची ग्रामीण भागात लाभार्थींची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, नागरी भागात मुख्य सेविकांची आहे. योजनेतील लाभार्थ्यांना योजनेचा पहिला ५ हजारांचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाला ५० लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. यातून सुमारे एक हजार पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणाचे नियोजन विभागाचे आहे.
असा मिळतो लाभ – Lek Ladki Yojana Pahila Hafta Date
या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना त्यांच्या कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळतील. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मिळतील. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख १ हजार रुपये मिळतील.
‘लेक लाडकी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी प्रती लाभार्थी ५ हजाराप्रमाणे ३१८ मुलींच्या संयुक्त बँक खात्यात वळते करण्यात आले आहे. लवकरच ६०० मुलींनाही योजनेतील पहिल्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे.
,मला तिनं मुली आहेत त्यातील दोन मुलींचा २०२३ आधीचा जन्म आहे.एका मुलीचा २०२३ नंतरचा जन्म आहे.तर तिला सदर योजना लागु होईल का…
Paise nahi aale aajun
Lek ladki yojna
पैसे नाही आलेत आजून. कुठे चेक करू शकतोस
मी माझ्या मुलीचा अर्ज तीन महिन्या पासून केलेला आहे.परतू आता पर्यंत पहिला हप्ता आलेला नाही.आणि अजून माहिती पण मिळाली नाही.
फोर्म भरुन 5 महिने झाले तरी पैसे आले नाहीत आणि कुठे चेक करायच कोण सांगत पण नाही पोस्ट ओफीस मधे पैसे आले गेले चा मैसेज ही पाठवायची पध्दत नाही आणखी अंगणवाडी सेविका पण तैयानाच काय माहित नाही पैसे कधी येणार
मी माझ्या मुलीचा अर्ज पाच महिन्या पूर्वी केलेला आहे.परतू आता पर्यंत पहिला हप्ता आलेला नाही.आणि अजून माहिती पण मिळाली नाही.
Three month zale tri pase jama nhi zale