Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



Lek Ladki Yojana Beneficiary Status – ‘लेक लाडकी’ योजनेचा कोणाला मिळणार लाभ याबाबत जवळच्या अंगणवाडी ताईंशी संपर्क साधा

Lek Ladki Yojana Hafta Online


Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana Beneficiary Status Check

Lek Ladki Yojana Beneficiary Status: लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे, जिचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, त्यांचा जन्मदर वाढवणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक हातभार लावणे हा आहे. ही योजना १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी मुलीला तिच्या जन्मापासून ते वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत तिच्या शिक्षण आणि संगोपनाच्या विविध टप्प्यांवर एकूण ₹१,०१,००० (एक लाख एक हजार रुपये) एवढी रक्कम पाच हप्त्यांमध्ये थेट बँक हस्तांतरणाद्वारे (DBT) दिली जाते. बालविवाह रोखणे, मुलींचे कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे यांसारखी महत्त्वपूर्ण उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद सातारा च्या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेमार्फत या योजनेचे अर्ज स्वीकारून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाते.

लाभ कसा  व किती मिळणार आहे

अ.क्र.तपशिलहप्तारक्कम रूपये
1मुलीच्या जन्मा नंतरपहिला हप्ता5000/-
2इयत्ता पहिलीतदुसरा हप्ता6000/-
3इयत्ता सहावीततिसरा हप्ता7000/-
4इयत्ता अकरा वीतचौथा हप्ता8000/-
5मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्या नंतरपाचवा हप्ता75000/-
एकुण101000/-

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपध्दती

.क्र.निर्देशांक
1मुलीच्या पालकांनी अंगणवाडी सेविकेकेडे अर्ज सादर करणे-(सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रांमीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यांनतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा)
2अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्याकडुन अर्ज परिपुर्ण भरून घ्यावा  पर्यवेक्षिका यांचेकडे सादर करावा(गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याकडे सादर करावा.)
3अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी अर्जाची तपासणी करून दरमहा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे प्रस्ताव  यादी मंजुरीसाठी सादर करावी.(अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी सदर अर्जाची व प्रमाणंपत्रांची छाननी/तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी  जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी सादर करावी.)
4अंगणवाडी पर्यवेक्षिका/बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अर्ज प्राप्त झालेनंतर अर्जाची छाननी करून अर्ज अपुर्ण  काही कागदपत्रे नसलेस अर्जदारास लेखी कळविणे(पर्यवेक्षिका/बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केलेला नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत पूर्तता करण्याकरिता अर्जदारास लेखी कळवावे.त्याप्रमाणे अर्जदाराने 1 महिन्यात कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज दाखल करावा.काही अपरिहार्य कारणास्तव अर्जदार या मुदतीत अर्ज दाखल करून शकला नाही तर त्यास वाढीव 10 दिवसांची मुदत देण्यात यावी.अशा प्रकारे कमाल 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सदरच्या अर्जावर कार्यवाही पूर्ण करावी.)
5बाल विकास प्रकल्प अधिकारी/जिल्हा महिला  बाल विकास अधिकारी यांनी अर्जाची  कागदपत्रांची तपासणी करून दरमहा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचेकडे  अपुर्ण अर्जांचा अहवाल तसेच परिपूर्ण प्रस्ताव आनलाईन मंजुरीसाठी सादर करावे.(अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी सदर अर्जाची व प्रमाणंपत्रांची छाननी/तपासणी करून अर्ज प्रकल्प स्तरावर दिलेनंतर  प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी तसेच संस्थामधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आनलाईन प्रस्ताव  जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी  वरील कागदपत्रासहं आनलाईन मंजुरीसाठी सादर करावेत.)
6अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अनाथ प्रमाणपत्र जोडणे-(अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करतांना महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम प्राधिका-यांकडून देण्यात  आलेले अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.)
7एखादे कुंटुंब आपले राज्यातुन अन्य राज्यातील जिल्ह्यात स्थलांतर झालेनंतर.(एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेतील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ अनुज्ञेय होण्याकरिता त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा .सदर अर्जाची संबंधित अधिका-यांनी छाननी करून पात्र ठरत असल्यास राज्य कक्षाक़डे शिफारस करावी व राज्य कक्षाकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल.त्याचप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरीत झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा व राज्य कक्ष अंतिम निर्णय घेईल.)

योजनेअंतर्गत विविध जबाबदाया व कार्यपध्दती खालीलप्रमाणे राहील.

फॅार्मची आनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे.

लेक लाडकी योजनेच्या लाभार्थींची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका,संबंधित पर्यवेक्षिका यांची राहील.लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून लाभार्थीचा अर्ज व सर्व कागदपत्रे आनलाईन पोर्टलवर अपलोड करावीत व प्रमाणित केल्यानंतर लाभार्थांचा आनलाईन अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा.

अ.क्र.कार्यक्षेत्रलाभार्थांची अर्ज स्वीकृती/तपासणी/पोर्टलवर अपलोड करणेअर्ज पडताळणी करून सक्षम अधिका-याकडे आनलाईन मान्यतेकरिता सादर करणे अंतिम मंजूरी देण्या करिता सक्षम अधिकारीपोर्टलची संपूर्ण जबाबदारी,संचालन,अद्ययावत इ.बाबत राज्य कक्ष प्रमुख जबाबदार असतील.
1ग्रामीणअंगणवाडी सेविका/

पर्यवेक्षिका

संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, (म.व बा.वि.)
2नागरी भागअंगणवाडी सेविका/

मुख्यसेविका

संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी)

अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका  यांनी  अपलोड केलेले अर्ज पोर्टलवर परिपूर्ण अपलोड केले असल्याबाबतची  सक्षम अधिका-यांनी खातरजमा करावी.जिल्हा स्तरावरील अधिका-यांनी सदर आनलाईन अर्ज Digitized  करून लाभार्थांस अंतिम लाभ मिळेपर्यंत जतन करण्याची दक्षता घ्यावी.

सदर योजनेची प्रसिध्दी  जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी.गाव पातळीवरील होणा-या ग्रामसभा/महिला सभांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

सदर योजनेअंतर्गत लाभार्थांना विविध टप्यावर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तातंरण(DBT) व्दारे  देण्यात येईल.त्याकरिता महिला व बाल विकास विभाग राज्यस्तरावरून  निश्चित केलेल्या आयसीआयसीआय बॅंकेमध्ये खाते उघडण्यात आले असुन त्यामधुन पोर्टलप्रमाणे लाभार्थांना लाभ अनुज्ञेय करण्याकरिता ग्रामीण क्षेत्राच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांना निधी वर्ग करण्यात येईल.व ते थेट लाभार्थी हस्तातंरण(DBT) व्दारे  लाभार्थांच्या खात्यावर जमा करतील.त्याकरिता लाभार्थी व माता यांचे संयुक्त बॅंक खाते उघडणे अनिवार्य राहील. जिल्हास्तरावरून सदर लाभार्थींची पडताळणी करून पात्र यादी तयार केली जाते.तदनंतर बॅकेला सदर लाभार्थीच्या नावे निधी वर्ग (DBT)करणेबाबतची मंजुर यादी दिली जाते व त्यानुसार सदर रक्कम बॅंकेमार्फत लाभार्थीच्या व तिच्या आईच्या संयुक्त खात्यावर बॅंकेमार्फत DBT व्दारे जमा केली जाते. एखाद्या  प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास लाभार्थी व पिता यांचे संयुक्त खाते उघडण्यात यावे.मात्र,अशा प्रकरणात अर्ज सादर करतांना मातेचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.अनाथ मुलींना लाभ देताना विभागाच्या इतर योजनांचा लाभ ज्या पध्दतीने त्यांना देण्यात येतो,त्याप्रमाणे कार्यपद्दती करावी.

एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेतील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ अनुज्ञेय होण्याकरिता त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा .सदर अर्जाची संबंधित अधिका-यांनी छाननी करून पात्र ठरत असल्यास राज्य कक्षाक़डे शिफारस करावी व राज्य कक्षाकडून अंतिम निर्णय घेण्यात यावा.त्याचप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरीत झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा व राज्य कक्ष अंतिम निर्णय घेईल.)

Lek Ladki Yojana Beneficiary Status: महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबविली जात आहे. पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींसाठी ही योजना राबविली जात आहे. ४ हजार ९५० लाभार्थ्यांचा प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे पहिला हप्ता ज्यांच्या त्यांच्या पालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली.

या योजनेसाठी सोलापूर शहर-जिल्ह्यातून ५ हजार ९५० अर्ज प्राप्त झाले. यातील १ हजार पात्र लाभार्थी मुलींच्या पालकांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे योजनेचा पहिला हप्ता यापूर्वीच जमा करण्यात आला आहे. ३ हजार ९५० लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची १ कोटी १७ लाख ५० हजार रुपये एवढी लाभाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित १ हजार लाडकी अर्जावर पहिला हप्ता योजना जमा करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

जवळच्या अंगणवाडी ताईंशी संपर्क साधा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत लेख लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता जवळच्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले.

लेक लाडकी योजनेची माहिती

योजनेचे नावलेक लाडकी योजना
फायदामुलींना ₹१०,१००० मिळतील.
ते कोणी सुरू केले?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचा शुभारंभमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२३
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मुली
वयोमर्यादा१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुली
अर्जाच्या तारखा१ एप्रिल २०२४
उद्दिष्टमुलींचा जन्मदर वाढवणे आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
मिळणारी रक्कम₹१०१०००
अर्ज प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळLekladkiyojana.com

योजनेसाठी अटी व शर्ती – Eligibility Criteria For Lek Ladki Yojana

१ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील, पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक किंवा दोन्ही मुली या योजनेच्या लाभास पात्र असणार आहेत. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे सरकारी सेवा रहिवासी असणे आवश्यक, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा जास्त नसावे.

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे – List Of Documents Required For Lek Ladki Yojana

लाभार्थी जन्म दाखला, लाभार्थी आधार कार्ड (प्रथम वेळी ही अट शिथिल राहील), पालकांचे आधार कार्ड, कुटुंब प्रमुख उत्पन्न दाखला, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, बैंक पासबुक छायांकित प्रत, मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर), शेवटच्या टप्प्यासाठी लाभार्थ्यांचे संबंधित शाळेचे बोनाफाईड, पालकांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाला नसणे आवश्यक आहे.


Lek Ladki Yojana Beneficiary Status: ‘बेटी पढाओ बेटी पढाओ’साठी मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाकडून ‘लेक लाडकी’ ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर ते १८ वर्षांची झाल्यानंतरपर्यंत एकूण १.०१ लाख रुपये मिळणार आहे. . तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर तीन हजारांहून अधिक पालकांनी महिला व बाल कल्याण विभागाकडे अर्ज सादर केले असून, पहिल्या हप्त्याची अर्थात पाच हजारांची रक्कमही ३१८ जणींच्या खात्यावर जमा झाली. तर ६०० ‘लेकी’च्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

राज्य शासनाकडून एक एप्रिलपासून ही योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतील लाभाची रक्कम लाभार्थ्यांना ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी)द्वारे थेट बँक खात्यात देण्यात येत आहे. १ एप्रिल २०२३ नंतर एक मुलगी व मुलगा आहे.

Lek Ladki Yojana Eligibility

त्यांना ही योजना लागू आहे. यासह ज्यांना एकच मुलगी आहे. दोन्ही मुली आहेत, असे कुटुंबीय या योजनेस पात्र ठरणार आहेत. या ‘लेक लाडकी’ योजनेची ग्रामीण भागात लाभार्थींची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, नागरी भागात मुख्य सेविकांची आहे. योजनेतील लाभार्थ्यांना योजनेचा पहिला ५ हजारांचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाला ५० लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. यातून सुमारे एक हजार पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणाचे नियोजन विभागाचे आहे.

असा मिळतो लाभ – Lek Ladki Yojana Pahila Hafta Date

या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना त्यांच्या कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळतील. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मिळतील. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख १ हजार रुपये मिळतील.

‘लेक लाडकी’ योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी प्रती लाभार्थी ५ हजाराप्रमाणे ३१८ मुलींच्या संयुक्त बँक खात्यात वळते करण्यात आले आहे. लवकरच ६०० मुलींनाही योजनेतील पहिल्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे.



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..
14 Comments
  1. आप्पा जगन्नाथ जगताप says

    ,मला तिनं मुली आहेत त्यातील दोन मुलींचा २०२३ आधीचा जन्म आहे.एका मुलीचा २०२३ नंतरचा जन्म आहे.तर तिला सदर योजना लागु होईल का…

  2. Satish Bhaskar. Salunke says

    सर मला दोन मुलीआहे तर मला शिकवायला पैसे नाही. ऐक 8 वी. तर दुसरी मु 6वी ला

  3. 7208505973 says

    लेक लाडकी ह्या योजनेचे आलेले पैसे मि ऑनलाईन चेक कसे करू शकतो

  4. Praful kolhe says

    Muje.laab nhe mila

  5. Kaveri Sachin sawant says

    Lek ladki yojana

  6. Sharwari hupade says

    Paise nahi aale aajun

  7. Sharwari hupade says

    Lek ladki yojna

  8. 7208505973 says

    पैसे नाही आलेत आजून. कुठे चेक करू शकतोस

  9. Shivahari Gaygol says

    मी माझ्या मुलीचा अर्ज तीन महिन्या पासून केलेला आहे.परतू आता पर्यंत पहिला हप्ता आलेला नाही.आणि अजून माहिती पण मिळाली नाही.

  10. राजू गायकवाड says

    फोर्म भरुन 5 महिने झाले तरी पैसे आले नाहीत आणि कुठे चेक करायच कोण सांगत पण नाही पोस्ट ओफीस मधे पैसे आले गेले चा मैसेज ही पाठवायची पध्दत नाही आणखी अंगणवाडी सेविका पण तैयानाच काय माहित नाही पैसे कधी येणार

  11. MOHINI BABU KAMBLE says

    मी माझ्या मुलीचा अर्ज पाच महिन्या पूर्वी केलेला आहे.परतू आता पर्यंत पहिला हप्ता आलेला नाही.आणि अजून माहिती पण मिळाली नाही.

  12. Sushil Hajare says

    Three month zale tri pase jama nhi zale

  13. Vijay Bhusare says

    6 महिने झाले फॉर्म भरून पण अजून पण पैसे आलेले नाही

  14. Admin says

    new info

Leave A Reply

Your email address will not be published.