महाराष्ट्र तीर्थ दर्शन योजना सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागांतर्गत राबविली जाणार – Maharashtra Tirth Darshan Yojana
Maharashtra Tirth Darshan Yojana
Maharashtra Tirth Darshan Yojana: राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागांतर्गत राबविली जाणार आहे. पर्यटन खाते भाजपकडे असल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील विभागाच्या माथी योजना मारल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे निधीची चणचण असल्याचे कारण देत विद्यार्थी अनुदानाला कात्री लावली असताना सामाजिक न्याय विभागामार्फत ही योजना राबविण्यावरून टीका होत आहे. तिर्थस्थळांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ आणि ‘वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापुरुषांच्या नावावर रुग्णालयांपासून ते शेतकरी कर्जमाफीपर्यंतच्या अनेक योजनांसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला गेला. तसेच सर्व योजनांची नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
-
अर्ज कसा करायचा ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मोफत तीर्थदर्शन योजना?
-
‘तीर्थस्थळ दर्शन’ योजनेसाठी कोण ठरणार पात्र ?
समान धोरणाच्या नावावर शासनाने सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत सुरू असलेल्या अनेक योजनांच्या निधींमध्ये कपात केली आहे. पीएच.डी. अधिछात्रवृत्तीची विद्यार्थी संख्या कमी करण्यात आली. नुकतेच परदेशी शिष्यवृत्तीतही मोठी कपात करण्यात आली. असे असताना पर्यटनाशी संबंधित योजनाही सामाजिक न्याय विभागाकडे दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना न्याय देण्याच्या भावनेतूनच ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सामाजिक न्याय विभागाकडे सोपवण्यात आली आहे. तसेच खुद्द मुख्यमंत्र्यांचे याकडे प्रत्यक्ष लक्ष राहणार असल्याने त्याचा अनेकांना फायदा होईल या भावनेतून हा निर्णय घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सचिव सुमंत भांगे यांना अनेकदा संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.