Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


मनोहर पर्रीकर स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू, त्वरा करा । Manohar Parrikar Scholarship Application

Manohar Parrikar Scholarship Online Apply


Telegram Group Join Now

Manohar Parrikar Scholarship Application: शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी मनोहर पर्रीकर स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी दिली आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली ही महत्त्वपूर्ण राज्य सरकारची योजना आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे.

या योजनेचे अर्ज २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर [http://www.dhe goa.gov.in](http://www.dhe goa.gov.in) उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांना ३१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे संचालक सावईकर यांनी स्पष्ट केले आहे.

अर्जदारांसाठी सूचना

भारतात अथवा देशाबाहेर पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला अथवा पीएच.डी करत असलेला कोणताही पात्र उमेदवार योजनेसाठी अर्ज करू शकतो. उमेदवाराने ऑनलाईन अर्जात भरलेला तपशीलच केवळ ग्राह्य मानून तेवढाच दस्तावेज किंवा तपशील स्वीकारला जाईल. निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीची वेळ व दिनांक सांगितली जाईल.

अशी कार्यप्रणाली अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सबमिट
केल्यानंतर त्याला तत्काळ तपशीलासह ई-मेल पाठविला जाईल. ई-मेलची प्रिंट आउट, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वयं-साक्षांकित केलेली कागदपत्रे/ प्रमाणपत्रांच्या प्रती १५ फेब्रुवारीपर्यंत उच्चशिक्षण संचालनालय, पर्वरी येथे स्पीड पोस्टने किंवा हँड डिलिव्हरीद्वारे जमा करायच्या आहेत.

इथे साधू शकता संपर्क
अधिक माहितीसाठी अथवा कोणत्याही प्रश्नांसाठी कार्यालयीन वेळेत ०८३२-२४१५५८५/२४१०८२४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे उच्चशिक्षण संचालनालयाने कळविले आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.