माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे – MaziI Ladki Bahin Yojana Required Documents

MaziI Ladki Bahin Yojana Required Documents


Telegram Group Join Now

MaziI Ladki Bahin Yojana Required Documents – महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

MaziI Ladki Bahin Yojana Required Documents

योजनेचे स्वरुप :- पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेचे लाभार्थी कोण राहतील :- महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

Read ThisMaharashtra Budget 2024 -राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी महत्त्वाच्या घोषणा; अर्थमंत्री अजित पवारांकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर

सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:- (List of Documents For Ladki Bahin Yojana)

Following are the documents required for the Ladki Bahin Yojana 2024 in Maharashtra in Marathi. Candidates should submit the said documents for application process.

  • (१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  • (२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  • (३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
  • (४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
  • (५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • (६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • (७) रेशनकार्ड.
  • (८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

List of Documents 2024 MaziI Ladki Bahin Yojana

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..
8 Comments
  1. Chaitrali Mahesh Wayal says

    Hi

  2. Ganesh says

    Post office madhe saving account ahe te chalel ka

  3. Anand meshram says

    Rashan card par name ho to kya kare

  4. Anand meshram says

    Rashan card par name nahi hai to kya kare

  5. दैवशाला राहुल मिटकर says

    राशन कार्ड नंबर आहे कार्ड नाही चालेल का

  6. दैवशाला राहुल मिटकर says

    Post office acount ahe

  7. savita kamble says

    hoe apply

  8. kunal kamble says

    how apply this form

Leave A Reply

Your email address will not be published.