Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


कोकण, पुण्यात म्हाडाची ५,६०० घरे, लवकरच निघणार नवीन जाहिरात! – Mhada Konkan Homes 2024

Mhada Konkan Homes 2024


Telegram Group Join Now

मुंबईनंतर आता कोकण, पुणे आणि संभाजीनगर मंडळातही म्हाडाने घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत सुमारे १,९०० घरांची सोडत काढण्यात येणार आहे, तर कोकण, पुणे आणि संभाजीनगर मंडळात सुमारे ५,६०० घरांच्या सोडतीची जाहिरात काढली जाणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाकडून दरवर्षी घरांची सोडत काढली जाते.

त्यामुळे सर्वसामान्यांना त्याची प्रतीक्षा लागली होती. अखेर म्हाडाने खुशखबर देताना कोकण मंडळात १,६००, पुणे मंडळात २,५००; तर संभाजीनगर मंडळात १,५०० घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्याची तयारी सुरू केली आहे. ही जाहिरात आठवडाभरात येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या घरांची जुळवाजुळव सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर तत्काळ जाहिरात काढली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील घरांच्या विक्रीसाठी म्हाडाकडून याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात शक्यता आहे.  सामान्यांना सहजपणे घर घेता यावे म्हणून म्हाडाकडून कोकण, पुणे आणि संभाजीनगर मंडळातील घरांच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात काढली जाणार आहे.

 

 



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.