नागपूर मध्ये ५८ घरकुलांसाठी अर्ज मागविण्यात आले, ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करावे। NMRDA PM Awas Yojana Application Form
NMRDA PM Awas Yojana Application Form
NMRDA PM Awas Yojana Application Form: नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने (एनएमआरडीए) प्रधानमंत्री आवास योजना (घटक क्र. 3) अंतर्गत मौजा भिलगाव येथे १९० घरकुले उभारण्यात आली आहेत. यातील १३२ घरकुलांची बुधवारी सोडत काढण्यात आली. सोडतीनंतर रिक्त असलेल्या ५८ घरकुलांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. कामठी तालुक्यातील मौजा भिलगाव, ख. क्र. १४६/३,४,५, १४६- १४१/१ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांकरिता १९० घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जातून सोडतीद्वारे १३२ अर्जधारकांना घरकुलांचे वाटप करण्यात आले सोडतीनंतर रिक्त असलेल्या ५८ घरांसाठी भिलगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
NMRDA House Application Form
इच्छुकांसाठी गोकुळपेठ येथील एनएमआरडीए व नासुप्रच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. माहिती भरून १०० रुपयांच्या नोंदणी शुल्कासह अर्ज सादर करावे, तसेच अर्जासोबत अर्जदारांनी स्वताचे आधार कार्ड (अविवाहित असल्यास) किंवा पती व पत्नीचे आधार कार्डची (विवाहित असल्यास) प्रत व भिलगाव ग्रामपंचायत रहिवासी असल्याचा प्रमाणपत्र किंवा भिलगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असल्याचे १०० रुपयांच्या मुद्रांकावर स्वयं घोषणापत्र, मतदार यादीतील नावाची प्रत, मतदार कार्डच्या प्रतसह सादर करणे अनिवार्य आहे.
अर्जाची तपासणी करून पात्र अर्जदारांची यादी एनएमआडीएमच्या (https://nmrda.neml.in/nit.nag pur.org) संकेतस्थळावर वर उपलब्ध करण्यात येईल व पात्र अर्जदारांची सोडत काढली जाईल. इच्छुकांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन एनएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मीणा यांनी केले आहे.