१०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, ४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती! – scr.indianrailways.gov.in
scr.indianrailways.gov.in
रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकजे आहे. रेल्वे भरती बोर्डाने ४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीबाबत जाहिरात रेल्वे भरती बोर्डाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती सुुर आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही scr.indianrailways.gov.in.या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
इच्छुक उमेदवार रेल्वे रिक्रूटमेंट सेल scr.indianrailways.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत वेगवेगळ्या ट्रेडमध्ये नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, डिझेल मेकॅनिक, एसी मेकॅनिक, पेंटर आणि इतर व्यवसायांचा समावेश आहे. जास्तीत जास्त 1053 पदे इलेक्ट्रिशियन आणि 1742 पदे फिटरसाठी आहेत. या भरतीअंतर्गत AC मेकॅनिकच्या 143 जागा, वेल्डरच्या 713 जागा, डिझेल मेकॅनिकच्या 142 जागा, पेंटरच्या 74 जागा आणि इतर ट्रेडसाठी पदे आहेत. शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 24 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
साउथ सेंट्रल रेल्वेकडून ही भरती जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये कंडिशनिंग, कारपेंटर, डीझेल मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, पेंटर, वेल्डक या पदांसाठी भरती जाहीर करण्या आली आबे. ४२३२ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. (Railway Recruitment 2025) रेल्वेतील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी परीक्षा पास केलेली असावी. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.या नोकरीबाबत सविस्तर महिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वयोगटातील असावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेशिवाय होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. इतर प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.