भाविकांच्या सुविधेसाठी ‘पंढरीची वारी’ अँप सुरू – Pandharichi Wari App Download
Pandharichi Wari App Download
Pandharichi Wari App Download – आषाढी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पंढरीत येतात. आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून ‘पंढरीची वारी हे अँप विकसित करण्यात आले आहे. या अँपच्या माध्यमातून वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोई-सुविधांची माहिती उपलब्ध होणार आहे. याशिवाय पालखी मार्गावर वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या अँपची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. गर्दीच्या काळात मदत व्हावी, यासाठी आषाढी वारीमध्ये पंढरीची वारी नावाने मोबाईल अँप https://play.google.com/ store/apps/details–id–com. aashadhi wari सुरू करण्यात आले आहे.
या अँपचा लाभ भाविकांनी घ्यावा, ज्या महामार्गावरून दिंडी सोहळा येणार आहे, तो महामार्ग ते पंढरपूरपर्यंत पोचेपर्यंत हे अँप वारकऱ्यांना माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामध्ये वारीचे मुक्काम ठिकाण, पोलिस स्टेशन, मंदिर, पाण्याचा टँकर, हॉस्पिटल, वाहनतळ, शाळा, शौचालय, जवळपासची शासकीय कार्यालये आदी ठिकाणांची माहिती दिली आहे.