Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


इन्कम टॅक्स भरणे म्हणजे देश सेवा करणे- प्रत्येकाने इन्कम टॅक्स वेळेवर भरावा!

Paying Income tax means patriotism


Telegram Group Join Now

इन्कम टॅक्स हा प्रत्येक व्यवसायातील व्यक्तीला भरावा लागतो. इन्कम टॅक्स विषयी असणारा कायदा हा टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सत्यता पडताळून पाहत असतो. सध्या डिजिटल युग असल्यामुळे व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वास्तविक परिस्थितीचे भान ठेवून योग्य तो नफा तोटा नोंदविला पाहिजे. इन्कम टॅक्स भरणे, म्हणजे देश सेवा करणे आहे. त्यामुळे प्रत्येकाने इन्कम टॅक्स वेळेवर भरावा, असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते सीए डॉ. गिरीश आहुजा यांनी केले.

Paying Income tax means patriotism
समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोनतारा भनसाळी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इन्कम टॅक्स कायदा व बजेट २०२४’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात ते बोलत होते. चर्चासत्राच्या प्रारंभी डॉ. गिरीश आहुजा, समता चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, सोनतारा भनसाळी ट्रस्ट अध्यक्ष अरविंद भनसाळी, उपाध्यक्ष संजय भनसाळी, व्याख्यानमाला संयोजक राजकुमार बंब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय प्रसाद भंडारी यांनी करून दिला. प्रास्ताविकात काका कोयटे म्हणाले की, समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोनतारा भनसाळी ट्रस्ट सामाजिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर व्याख्याने, शिबिरे आयोजित करीत असते. डॉ. आहुजा यांनी इन्कम टॅक्स कायदा व २०२४ च्या बजेट विषयी सर्व सामान्यांना समजेल अशा साध्या, सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली. तसेच, उपस्थितांच्या शंकांचेही समाधान केले. सूत्रसंचालन समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.