‘पीजीआयएम इंडिया’ची हेल्थकेअर फंड योजना ११ डिसेंबरपासून खुली होणार | PGIM India Healthcare Fund Details

PGIM India Healthcare Fund Details


Telegram Group Join Now

PGIM India Healthcare Fund Details: पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण कंपन्यांचे शेअर आणि शेअरशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करणारी पीजीआयएम इंडिया हेल्थकेअर फंड ही नवी गुंतवणूक योजना (एनएफओ) सुरू केली आहे.

या फंडासाठी बीएसई हेल्थकेअर हा आधारभूत निर्देशांक राहणार आहे. हा एनएफओ तीन डिसेंबर रोजी बंद होईल. त्यानंतर ही योजना पुन्हा ११ डिसेंबरपासून खुली होणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. या योजनेतील शेअरमधील गुंतवणुकीची जबाबदारी आनंदा पद्मनाभन अंजेनेयन, विवेक शर्मा आणि उत्सव मेहता हे सांभाळणार आहेत, तर रोखे गुंतवणुकीचे व्यवस्थापन पुनीत पाल करणार आहेत.

या योजनेबाबत कंपनीचे सीईओ अजित मेनन म्हणाले, “गुंतवणूकदारांना देशातील वाढत्या आरोग्य सेवा क्षेत्राचा लाभ घेण्याची आकर्षक संधी हा फंड देत आहे. कमी खर्च, नावीन्य, आरोग्य विम्यासाठी वाढती जागरूकता, वाढता एफडीआय प्रवाह आणि वाढत चाललेले वैद्यकीय पर्यटन आणि अन्य काही घटकांचा भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राला फायदा होत आहे. एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे. त्यापुढील सर्वोत्कृष्ट गुंतवणूक म्हणजे स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य किंवा आयुर्विम्याद्वारे संरक्षण करणे. त्यामुळे या फंडात गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.”



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.