Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



‘शबरी घरकुल’ योजना बंद होणार? आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती!| Shabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra

Shabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra


Telegram Group Join Now

shabari gharkul yojana Will Be Stopped??

Shabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra: घर कसंही असो, स्वतःचं हक्काचं पक्कं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. आदिवासी बांधवांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘शबरी आदिवासी घरकुल योजना’ राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो आदिवासी कुटुंबांना हक्काचे छप्पर मिळाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही योजना बंद होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर सुरू आहे. अखेर या संभ्रमावर स्वतः आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पडदा टाकला असून विधानसभेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Read This: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! म्हाडाकडून तब्बल 10 हजार घरांची घोषणा !

नक्की काय निर्णय झालाय?
नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात संजय केळकर, राजेंद्र गावित, सदाशिव खोत आणि इतर आमदारांनी शबरी योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केले की, ही योजना पूर्णपणे बंद केली जात नाहीये, तर तिचे स्वरूप बदलण्यात येत आहे.

ग्रामविकास विभागाच्या ४ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार (GR), २०२४-२५ ते २०२८-२९ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी राज्यातील सर्व राज्य पुरस्कृत घरकुल योजना (ज्यात शबरी योजनेचाही समावेश आहे) आता ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२’ (PMAY-G Phase 2) अंतर्गत जोडल्या (Merge) जाणार आहेत.

महत्त्वाचा बदल: यापुढे शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी राज्य सरकारकडून ‘स्वतंत्र उद्दिष्ट’ (Separate Target) ठरवले जाणार नाही. सर्व लाभार्थ्यांना आता थेट ‘पीएम आवास योजना टप्पा-२’ अंतर्गतच घरकुलांचा लाभ दिला जाईल.

‘समायोजना’ला आदिवासी संघटनांचा विरोध का?

शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे आदिवासी समाजात आणि संघटनांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव विजय कोकडे यांनी या निर्णयाला उघड विरोध दर्शवला आहे.

त्यांच्या मते:

  • निधीतील तफावत: सध्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’तर्गत लाभार्थ्याला १.२० लाख रुपये मिळतात, तर राज्याच्या ‘शबरी योजने’तर्गत अडीच लाख रुपयांचा (२.५ लाख) निधी मिळतो.
  • आर्थिक नुकसान: जर ही योजना केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट केली, तर आदिवासी बांधवांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीत घट होऊन त्यांचे नुकसान होऊ शकते.
  • “शबरी आवास योजना ही स्वतंत्रपणेच कायम ठेवली पाहिजे आणि उलट त्याचा निधी आणखी वाढवून देण्याची गरज आहे,” अशी मागणी कोकडे यांनी केली आहे.

पुढे काय? Shabri Gharkul scheme to be closed? Tribal Development Minister Ashok Uike gave this information

सरकारच्या या ‘मर्जर’च्या निर्णयामुळे प्रशासकीय सोय होणार असली, तरी जमिनीवर प्रत्यक्ष काम करताना आदिवासी बांधवांना आधीइतकाच निधी मिळणार की त्यात कपात होणार, याबाबत अद्याप पूर्ण स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे योजना जरी कागदावर बंद होत नसली, तरी स्वतंत्र अस्तित्त्व गमावल्यामुळे आदिवासी कुटुंबांना मिळणाऱ्या लाभावर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


shabari gharkul yojana apply online

Shabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra: Sabari Gharkul Yojana is being implemented on a large scale in the state to improve the standard of living of tribal families and meet their housing needs. Despite the lack of economic self-sufficiency in tribal communities, efforts are being made to help them build permanent homes. Through the Shabri Awas Yojana, financial assistance of Rs 1.2 lakh is provided to needy tribal families to enable them to purchase their own houses. As a result of this initiative, many poor families of the district have been able to secure proper housing.

आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या ज्या नागरिकांकडे स्वत:ची घरे नाहीत अथवा जे कुडामातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवार्‍यात राहतात अशा पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तीक लाभाची शहरी शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. 2024-25 वर्षासाठी या योजनेकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

शबरी घरकुल योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत, योजनेसाठी अर्ज येथे करा

Shahari Shabari Adivasi Gharkul Yojana : लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे, महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षापासून रहिवासी असावा, घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, यापुर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, वय 18 वर्षे पमर्ण असावे. स्वतःच्या नावाने बँक खाते असावे, वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत असावी. घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम 2 लाख 50 लाख राहील. ही रक्कम 4 टप्प्यात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. हे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा तसेच नगर परिषद कार्यालयास उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून नगर परिषद येथे सादर करावे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी कळविले आहे.

Name of Schemeशबरी आदिवासी घरकुल योजना Shabari Adivasi Gharkul Yojana (Shabari awas yojana)
Beneficiary familiesin the Scheduled Caste category
ObjectiveFinancial Assistance
BenefitsAs a result of this initiative, many poor families of the district have been able to secure proper housing.
Application Methodऑफलाईन

निकष काय आहेत ?

  • ग्रामीण लाभार्थ्यांना योजनेसाठी लाभार्थी भाग भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा वापर केलेला नाही.
  • या योजनेसाठी पात्र होण्यासाठी, लाभार्थी महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य केलेला असावा आणि तो अनुसूचित जमातीचा सदस्य असावा.
  • लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन किंवा शासनाने दिलेली जमीन असावी आणि त्याचे किंवा त्याच्या कुटुंबाला कोणतेही कायमस्वरूपी घर नसावे.
  • ग्रामीण भागातील अर्जदार कुटुंबांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु 1 लाख आहे.
  • या योजनेचा लाभ कुटुंबातील एका व्यक्तीलाच मिळू शकतो.

Important Document Required for Shabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra | शबरी घरकुल योजना कागदपत्रे

  • निवासाची पुष्टी करण्यासाठी, घराचे भाडेपट्टे
  • पाणी बिल, वीज बिल सोबत जातीचे प्रमाणपत्र
  • आणि योग्य प्राधिकरणाने जारी केलेले उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे.

१) अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो
२) रहिवासी प्रमाणपत्र
३) अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र
४) घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा.
५) उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा)
६) शिधापत्रिका
७) आधारकार्ड
८) एक रद्द केलेला धनादेश (Cancelled cheque) अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत (फोटो व खाते क्र. असलेले)

लाभार्थी पात्रता –

१) अनुसूचित जमातीचा असावा.
२) स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे.
३) महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षापासून रहिवासी असावा.
४) घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
५) यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
६) वय वर्षे १८ पूर्ण असावे.
७) स्वतःच्या नावाने बँक खाते असावे

Shabari Awas Yojana अंतर्गत घराच्या बांधकामासाठी देण्यात येणारी रक्कम मर्यादा

ग्रामीण क्षेत्र1.32 लाख रुपये
नक्षलवादी व डोंगराळ भाग1.42 लाख रुपये
नगरपरिषद क्षेत्र1.50 लाख
नगरपालिका क्षेत्र2 लाख

शबरी घरकुल योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • शबरी घरकुल योजना ची अर्ज प्रक्रिया
  • शबरी घरकुल योजनेची अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
  • शबरी घरकुल योजना हि शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी आहे .
  • शहरी भागातील अर्जदारांनी सर्वप्रथम महानगरपालिका किंवा नगरपालिका या ठिकणी कार्यालयात जाऊन शबरी घरकुल योजने अर्ज घेणे गरजेचे आहे.
  • अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारली गेलेली सर्व माहिती अचूक भरून आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून हा अर्ज महानगरपालिका मधील आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकारी यांच्या कडे जमा करावा.
  • ग्रामीण भागातील अर्जदारांनी ग्रामपंचायत कार्यालात जाऊन किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन शबरी घरकुल योजने अर्ज घेणे गरजेचे आहे.
  • अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारली गेलेली सर्व माहिती अचूक भरून आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून हा अर्ज कार्यालयातील आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकारी यांच्या कडे जमा करावा.
  • शबरी घरकुल योजनेंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये १.३२ लाख,डोंगराळ भागात १.४२ लाख,नगर परिषद क्षेत्रामध्ये १.५० लाख,आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये २.०० लाख इतके अनुदान मिळते याशिवाय सौचालाय बांधकामासाठी वेगळे १२,००० रुपये मिळतात.

घरकूल बांधकाम क्षेत्र-

वाचा येथील अनु.क्र.१ मधील आदिवासी विकास विभागाच्या दि. २८/०३/२०१३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घरकूलाचे बांधकामाचे चटई क्षेत्र हे २६९.०० चौरस फूट एवढे राहील.

उत्पन्न मर्यादा –

वार्षिक उत्पन्न मर्यादा ही रु.३.०० लक्ष पर्यंत असावी.

शबरी आदिवासी घरकुल योजनेचा अर्जा साठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट साठी क्लिक करा



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..
2 Comments
  1. Devidas shende says

    Lohara gharkul list 2024 for aadivasi commitee

  2. Admin says

    Shabri Gharkul scheme to be closed?

Leave A Reply

Your email address will not be published.