Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


पीक विमाची माहिती मिळणार एका कॉलवर सगळे अपडेट्स! – PMFBY Fasal Bima Yojana Toll Free Number


Telegram Group Join Now

PMFBY Fasal Bima Yojana Toll Free Number

PMFBY Fasal Bima Yojana Toll Free Number: Friends, as you know, farmers have to face natural calamities along with many problems while farming. In it, crops of farmers are destroyed due to sudden unseasonal rains and storms. All these natural calamities cause huge losses to agriculture. In such a case, the Prime Minister Crop Insurance Scheme (PMFBY Fasal Bima Yojana Toll Free Number) is implemented by the central government to compensate them. In it, the state government also encourages taking crop insurance. After that, many farmers take crop insurance. But the farmers are not getting paid soon. They are forced by the insurance companies. Therefore, the farmer who is devastated by natural calamities becomes helpless.

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांसह नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये अचानक येणार अवकाळी पाऊस, वादळामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होतात. या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. अशावेळी त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY Fasal Bima Yojana Toll Free Number) केंद्र सरकारकडून राबवली जाते. त्यामध्ये राज्य सरकारकडूनही पिकांचा विमा काढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यानंतर अनेक शेतकरी हे पिकांचा विमा काढतात. मात्र शेतकऱ्यांना लवकर मोबदला मिळत नाही. विमा कंपन्यांकडून त्यांना खेटे मारायला भाग पाडले जाते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिचलेला शेतकरी हवालदिल होतो.

विमा कंपन्यांच्या अशा मार्गाला आळा घालण्यासह शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक टोल फ्री क्रमांक जारी केला जाणार आहे. जो फक्त पीक विमा दाव्याच्या समस्या सोडवण्यासाठी असेल. हा टोल फ्री नंबर शेतकऱ्यांच्या सेवेत लवकरच येणार आहे.

नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक शेतकऱ्यांनी नुकसानाला सामाोरे जावं लागलं आहे. तर कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत सुमारे ३७ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. पण पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत दाखल केलेल्या अर्जांची सध्यस्थितीची माहिती शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांना विमा कंपन्यांचे खेटे मारावे लागतात. त्यावर आता सरकारकडून टोल फ्री नंबर जारी करण्यात येणार असून तो पुढील आठवड्यात जारी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून टोल फ्री नंबर जारी करण्यात येणार असून त्याचा क्रमांक १४४४७ असा असेल. या टोल फ्री क्रमांकावरून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांला त्याच्या अर्जाची स्थिती कळू शकणार आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.