Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


इमारतीतून लटकत स्टंट करणारी मीनाक्षी आहे कोण?, पुण्यातील रील स्टारवर गुन्हा!

Pune Viral Reel Star in Action


Telegram Group Join Now

सोशल मीडियावर सर्वधिक चर्चेत राहिलेले ॲप म्हणजे इन्स्टाग्राम, काही सेकेंदाचे रिल्स आणि तुम्ही चर्चेत येता. प्रसिद्ध होण्यासाठी आजची तरुणाई गुन्हेगारी, गँगस्टर, धमक्या देणारे आणि स्टंटचे रिल्स करण्यावर जास्त भर देतात. असेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वधिक व्हयरल होत आहेत. पुण्यातल्या स्वामी नारायण मंदिरा जवळ एका पडक्या इमारतीतील असाच एक व्हिडिओ काल व्हायरल झाला. इमारतीच्या छतावर एक मुलगी मुलाच्या हाताला लटकून स्टंट करताना दिसून आली. अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या सोबत चार-चार केमरामन तिचं शूट करत होते. हा व्हिडिओ प्रचंड व्हयरल झाल्यानंतर त्या स्टंट करणाऱ्या तरुणीवर भरती विद्यापीठ येथे गुन्हा दाखल झाला.

 

मीनाक्षी हनुमंत साळुंके राहणारी पुणे खेड. सध्या ती तऱ्हे गावात राहते. मीनाक्षी ही एक प्रोफेशनल योगा टीचर आणि कॅलिस्टनेस आहे. तिच्या प्रोगायत तिने अनेक योगाचे प्रयोग केले आहेत. तेच मोठे-मोठे स्टंट पण केले आहेत. यासाठी तिला वर्ल्ड बूकमध्ये नावजलं गेले आहे. अगदी लहान वयापासून तिला योगा करण्याची आवड आहे. पण, सार्वजनिक ठिकाणी अशे स्टंट करणं हे इतर युवांना अशा पद्धतीचे काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासारखं आहे. म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. मिनाक्षीचा जबाब घेण्यासाठी तिला भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं आहे.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.