सारथी तर्फे मिळणार मोडी लिपी प्रशिक्षण, ऑनलाइन अर्ज २३ जुलै पासून सुरु – Sarthi Modi Lipi Free Training Program
Sarthi Modi Lipi Free Training Program
Sarthi Modi Lipi Free Training Program – छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणेतर्फे ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २३ जुलैला सुरवात झाली. हार्डकॉपी सादर करण्याची अंतिम मुदत २० ऑगस्ट आहे. पात्र उमेदवारांना प्रतिमहा दहा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. तसेच या संदर्भातील नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतो. याठिकाणी ऑनलाइन वर्ग असेल. दोन महिन्यांत ६० तासांचा कालावधी असेल. यासाठी २० जागा आहेत. कोल्हापूरच्या सारथी उपकेंद्रातर्फे शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्रात कुठल्याही शाखेच्या पदवीधरासाठी सहा महिन्यांचा कोर्स असेल, ५० जागा राखीव ठेवल्या आहेत.
Filling form
Where is the filling form for filling .?