Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा स्वाधार योजनेचा लाभ मिळणार, हि आहे शेवटची तारीख | Swadhar Yojana Registration

Swadhar Yojana Online Form


Telegram Group Join Now

Swadhar Yojana Registration: सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील शासकीय वसतिगृहासाठी पात्र परंतु जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज नूतनीकरणासाठी मुदत मिळाली आहे. चालू वर्ष 2024-2025 मध्ये प्रवेश मिळवलेले फक्त प्रथम वर्षाचे विद्यार्थी नवीन स्वाधारसाठी अर्ज करू शकतात.

स्वाधार योजना माहिती मराठी

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहात प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी स्वाधार योजनेचा ऑफलाईन अर्ज समाजकल्याण कार्यालयात भरलेला आहे, असे विद्यार्थी २०२४-२५ या कालावधीत नूतनीकरणासाठी पात्र होतात.

स्वाधार योजना last date 2024

सोलापूर सहरातील व महापालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. मागील वर्षी प्रवेशित तसेच चालू वर्षांत प्रवेशित नवीन व नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांनी पोर्टलवर स्वाधार योजनेचा अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत करावा लागणार आहे. तसेच ऑनलाईन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाजकल्याण हिंगोली यांच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

येथे करावा लागणार अर्ज 

♦ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे २०२४-२५ मधील नवीन व नूतनीकरणाचे अर्ज www.hmas.mahait.org या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे.

♦ नूतनीकरणाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी न्यू ऐवजी एक्झिस्टींग या टॅबवर क्लिक करून स्वाधार सर्व्हिस हा पर्याय निवडावा व इयत्ता ११ वी प्रथम वर्षासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू टॅबवर क्लिक करून स्वाधार पर्याय निवड करून अर्ज करणे आवश्यक आहे.

स्वाधार योजना कागदपत्रे

१ अर्जदाराचा फोटो
२ अर्जदाराची सही
३ जातीचा दाखला
४ आधार कार्डाची प्रत
५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :
९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :
१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .
११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :
१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :
१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :
१५ शपथपत्र / हमीपत्र :
१६ भाडे करारनामा :
कोणतीही मुदतवाढ नाही

विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्यासाठी आता कोणत्याही पद्धतीची मुदतवाढ मिळणार नसल्याने या योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून दिलेल्या कालावधीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत.

अनुदान वितरण :

अ. क्र. खर्चाची बाब मुंबई शहर, मुंबई उपागर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिपरी, चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम इतर जिल्हयाचा ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासुन ५ कि.मि. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणि क संस्था या ठिकाणी अनुज्ञेय रक्कम
१) भोजन भत्ता रु. ३२,०००/- रु. २८,०००/- रु. २५,०००/-
२) निवास भत्ता रु. २०,०००/- रु. १५,०००/- रु. १२,०००/-
३) निर्वाह भत्ता रु. ८,०००/- रु. ८,०००/- रु. ६,०००/-
४) प्रति विद्यार्थी एकुण संभाव्य देय रक्कम रु.६०,०००/- रु.५१,०००/- रु.४३,०००/-

स्वाधार योजना फॉर्म PDF



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.