माझी लाडकी बहीण योजनेस अर्ज करताय, आपल्या सर्व प्रश्नांनची उत्तरे! – Mazi ladki bahin yojana FAQ

Mazi ladki bahin yojana FAQ


Telegram Group Join Now

Mazi ladki bahin yojana FAQ

Mazi Ladki Bahin Yojana FAQ – माजी लाडकी बहीण योजनेस अर्ज करताय? आपल्याला असलेल्या विविध प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळतील. योजने बद्दल पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तसेच अर्ज भरण्यास आवश्यक सर्व महत्वाच्या लिंक सुद्धा आम्ही दिलेल्या आहे.

CM Mazi Ladki Bahin Yojana Common Questions

Ladki Bahin Yojana 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी आपल्या सर्व प्रश्नाचं उत्तर

Mukhyamantri – Mazi Ladki Bahin Yojana Form
TitleDescriptionStart DateEnd DateFile
Mukhyamantri – Mazi Ladki Bahin Yojana Form01/07/202415/07/2024View (250 KB) Updated Application Form (96 KB) Government Resolution dated on 28 June 2024 (313 KB) Government Resolution dated on 03 July 2024 (285 KB) 

1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

राज्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे, महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.

हे ही वाचा>> माझी लाडकी बहीण योजनेस हमीपत्रात काय काळजी घ्यायची

2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली?

2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली.

3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत किती रक्कम मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील सर्व पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दराने वार्षिक 18000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

4. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे?

निराधार, विधवा आणि गरीब कुटुंबातील सर्व महिला या योजनेसाठी पात्र असतील.

हे ही वाचा>>माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे

5. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेचे वार्षिक उत्पन्न किती असावे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.

6. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ज्या इच्छुक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करता येईल.

7. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म कसा डाउनलोड करायचा?

सर्वप्रथम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि होम पेजवर दिलेल्या “अर्ज फॉर्म” च्या लिंकवर क्लिक करा. आता तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म PDF स्वरूपात उघडेल. तुम्ही येथे डाउनलोड वर क्लिक करून फॉर्म PDF स्वरूपात मिळवू शकता.

8. महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, मोबाईल क्रमांक (आधारशी जोडलेला), जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म इत्यादी कागदपत्रे. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता अर्जदार महिलेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

9. योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता कोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे?

योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि, पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे.)



अन्य महत्वाचे जॉब बघा..
4 Comments
  1. Bharat says

    No question

  2. v.thakare says

    utpannacha dakhla kami karnyat aala ka.???

  3. Ramabai Jalindar Bhoye says

    Ramabai Jalindar Bhoye 422211 2024

  4. सरीता अभिजित वडते says

    माझा फॉर्म रिजेक्ट झाला

Leave A Reply

Your email address will not be published.