अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांकडे ‘लाडकी बहीण योजने’साठी असा करा अर्ज, पूर्ण माहिती – Gram Sevak, Anganwadi Sevika Application Form

Gram Sevak, Anganwadi Sevika Application Form


Telegram Group Join Now

Gram Sevak, Anganwadi Sevika Application Form PDF

लाडक्या बहिणीं’चे अर्ज आता अंगणवाडी सेविकाच भरणार

राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका यासह ११ जणांना प्राधिकृत केले होते. मात्र, आता राज्य सरकारने शुक्रवारी एका नव्या आदेशाद्वारे फक्त अंगणवाडी सेविकांनाच या योजनेतील महिलांचे अर्ज भरून घेण्याची परवानगी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना आणली आहे. या योजनेला ग्रामीण भागातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत या योजनेत राज्यभरातील दीड कोटीहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. या योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सरकारने नागरी आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक सीआरपी अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहूड मिशन, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र अशा ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. सरकारकडून त्यांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये दिले जात होते. राज्यभरातील कोट्यवधी महिला या योजनेशी जोडल्या गेल्याने आता, सदर योजनेंतर्गत प्राप्त होणार्या अर्जाची संख्या कमी होत आहे.




गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर आता या योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत केलेल्या ११ पैकी अंगणवाडी सेविका वगळता इतरांचे अधिक्रमण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारले जाणार आहेत

Gram Sevak, Anganwadi Sevika Application Form – ‘मुख्यमंत्री माझी, लाडकी बहीण योजना’ योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी गावातील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकाकडे अर्ज द्यावा, असे आवाहन करीत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जनजागृतीही सुरू केल्याची माहिती दिली. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, सर्वांगीण विकासाच्या हेतूने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यात १ जुलैपासून राबविण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. या योजनेनुसार राज्य सरकारकडून २१ ते ६० वय असलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये बॅंक खात्यात जमा केले जाणार आहेत. पुढील पूर्ण माहितीसाठी या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा

Ladki Bahin Yojana Gram Sevak Arj

यासाठी संबंधित महिलेचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. संबंधित महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असावी. जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जनजागृती सुरू झाली. जिल्ह्यातील पात्र महिलांना १ ते १५ जुलै २०२४ या कालावधीत संबंधित गावच्या अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत आधार कार्ड, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखाच्या आत असल्याचा तहसीलदारांचा दाखला यांसह अन्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे.

..तर लाभार्थी अपात्र ठरेल

  • वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा अधिक.
  • कुटुंबात कोणी आयकरदाता असल्यास.
  • कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असल्यास.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेकरिता पात्र महिलांनी अंगणवाडी सेविका अथवा ग्रामसेवक यांच्याकडे १ ते १५ जुलै दरम्यान अर्ज सादर करावेत.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.