महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती सिलॅबस, परीक्षा पॅटर्न, निवड पद्धत ! MAFSU Bharti Exam Pattern and Syllabus
MAFSU Bharti Exam Pattern and Syllabus
Table of Contents
MAFSU Bharti Exam Pattern and Syllabus
MAFSU Bharti Exam Pattern and Syllabus: Maharashtra Animal & Fishery Sciences University (MAFSU), Nagpur has recently Published various Post Notification. The recruitment covers 175 vacancies across Group ‘B’, ‘C’, and ‘D’ categories. The selection is based on a Computer Based Test (CBT) followed by a professional/skill test for specific roles.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत रिक्त असलेल्या एकूण १७५ शिक्षकेत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीमध्ये वरिष्ठ लिपिक, लिपिक नि टंकलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि तंत्रज्ञ अशा विविध गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदांचा समावेश आहे. निवड प्रक्रिया ही प्रामुख्याने संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेवर (CBT) अवलंबून असून, काही तांत्रिक पदांसाठी संबंधित विषयाचे ज्ञान आणि कौशल्य चाचणी देखील घेतली जाणार आहे. उमेदवारांना परीक्षेमध्ये पात्र ठरण्यासाठी किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक असून, अंतिम निवड ही निव्वळ गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहित मुदतीत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
MAFSU Bharti Exam Pattern
The exam is conducted for 200 marks with a duration of 120 minutes (90 minutes for skill-based roles). Each question carries 2 marks.
1. Clerical Posts
लिपिकवर्गीय पदे- वरिष्ठ लिपिक, लिपिक नि टंकलेखक, कनिष्ठ भांडारपाल.
Applies to: Senior Clerk, Clerk cum Typist, and Junior Storekeeper.
2. Technical & Other Posts
Applies to: Pay & Account Officer, Assistant Farm Manager, Hospital Clinician, Lab Assistants, Technicians, etc.
इतर पदे
अधिदान व लेखाधिकारी, सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक (पशुवैद्यकीय), अधिष्ठाता यांचे तांत्रिक अधिकारी (पशुवैद्यकशास्त्र), रुग्णालय चिकित्सक, सहाय्यक व्यवस्थापक (गुण नियंत्रण), प्लांट ऑपरेटर (दुग्ध प्रक्रिया), शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, दुग्धशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, पशुचिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक (VLDA), रुग्णालय तंत्रज्ञ, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, प्रक्षेत्र सहाय्यक, वरिष्ठ यांत्रीक, बॉयलर ऑपरेटर, प्राणीसंग्रहालय तंत्रज्ञ (क्युरेटर), क्युरेटर तथा स्पेसिमन टेक्निशियन, प्रयोगशाळा सहाय्यक (पशुवैद्यकीय आणि दुग्ध तंत्रज्ञान), प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य विज्ञान), कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, मपमविवि/शिक्षकेत्तर/जाहिरात औषध भांडारपाल, कनिष्ठ यांत्रिक (यांत्रिकी व शीतकरण), ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, व्रणोपचारक, विजतंत्री, विस्तार प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यक, कनिष्ठ यंत्रज्ञ तथा तारतंत्री आणि पशुधन सहाय्यक.
MAFSU Bharti Exam Pattern and Syllabus
| Post Category | Subjects | No. of Questions | Total Marks | Duration |
|---|---|---|---|---|
| Clerical Posts (Senior Clerk, Clerk cum Typist, etc.) | Marathi, English, General Knowledge, Intellectual Test | 100 | 200 | 120 Minutes |
| Technical & Other Posts (Farm Manager, Lab Assistant, etc.) | General Subjects (60 Qs) + Technical Syllabus (40 Qs) | 100 | 200 | 120 Minutes |
| Skill-Based Posts (Driver, Machine Operator, etc.) | Written Test (120 Marks) + Skill Test (80 Marks) | 60 (Written) | 200 | 90 Minutes (Written) |
MAFSU Exam Important Selection Rules
- Minimum Passing: Candidates must secure at least 45% marks in the online examination to be eligible for the merit list.
- Normalization: Since the exam may be conducted in multiple shifts, a Normalization Method will be applied to calculate final scores.
- No Interview: Per government regulations for these groups, there are no interviews; selection is purely based on exam performance.
Note: For certain posts like Clerk and Typist, candidates must possess or obtain typing certificates (Marathi 30 wpm / English 40 wpm) within a specific timeframe if they belong to reserved categories like Ex-servicemen or PwD.
MAFSU Bharti Syllabus 2026
While the detailed post-wise technical syllabus is located in Appendix ‘C’ (page 18 onwards of the document), the general sections consist of the following:
General Subjects (Common for all)
- Marathi: Grammar, usage, vocabulary, and comprehension.
- English: Basic grammar, sentence structure, and vocabulary.
- General Knowledge: Current affairs, history, geography (focusing on Maharashtra), and general science.
- Intellectual Test (Reasoning): Logical reasoning, numerical ability, and problem-solving.
Technical Subjects (Post-Specific)
- Accounts/Finance: For Pay & Account Officer.
- Veterinary Science & Dairy Tech: For Lab Assistants and Farm Managers.
- Fishery Science: For Laboratory Assistant (Fishery).
- Mechanical/Technical: For Boiler Operator, Electrician, and Junior Technician.
- Library Science: For Library Assistants.
परिक्षेचा अभ्यासक्रम –
परिक्षेचा अभ्यासक्रम परिशिष्ट ‘क’ मध्ये विस्तृतरित्या दर्शविलेला आहे.
परीक्षा पद्धती : –
१. परीक्षा ही संगणक आधारीत ऑनलाइन (Computer Based) पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न ०२ गुणांचा राहील.
२. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/ प्र.क्र. ५४ / का.१३- अ दि. ०४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार संवर्ग क्र. १ ते ३५ या पैकी कुठल्याही पदाकरीता मुलाखती घेण्यात येणार नाहीत. उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षा आणि व्यावसायीक चाचणी (आवश्यक असलेल्या पदांकरिता) मधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येईल.
३. उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही- १०९७/प्र.क्र.३१/९८/१६-अ दिनांक १६ मार्च १९९९ आणि सामान्य प्रशासन विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-१११९/प्र.क्र. ३९/१६-अ दिनांक १९ डिसेंबर २०१८ तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दिनांक ४ मे २०२२, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. राआधो ४०२४/प्र.क्र. १४/१६-अ दिनांक २५ जानेवारी, २०२४ मधील धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल.
४. पात्रता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी, उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या
किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
५. निवडसूची तयार करतांना उमेदवारांना समान गुण मिळाल्यास उमेदवारांचा गुणवत्ताक्रम हा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्र.क्र.५४/का. १३-अ दिनांक ०४ मे २०२२ मध्ये नमूद निकषांच्या आधारे लावला जाईल.
MAFSU Syllabus 2026
परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based) पध्दतीने घेण्यात येणार असल्याने प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून आवश्यकतेनुसार एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसात एका पेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात येवू शकतात. त्यामुळे, सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण (Normalization) सुयोग्य पध्दतीने करण्यात येईल व त्या आधारे गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. सामान्यीकरणाची (Normalization) पद्धत/सूत्र सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. सामान्यीकरण प्रक्रियेचे सूत्र (Normalization Method Formula) जाहिरातीसोबत जोडण्यात येत आहे.


