मनमोहन सिंगांची स्वाक्षरी असलेली ही नोट बघितली का? Notes With Manmohan Singh Signature
Notes With Manmohan Singh Signature
Notes With Manmohan Singh Signature: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. डॉ. सिंग यांनी अर्थमंत्री, विरोधी पक्षनेते आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अशी महत्त्वाची पदे भूषवली होती. त्यांचा मृत्यू भारतीय राजकारणासाठी आणि आर्थिक क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, त्यांची स्वाक्षरी असलेल्या नोटा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत.